ऐतिहासिक चांद्रयान लँडिंग नंतर पुणेकरांचा आनंदोत्सव
पुणे : चांद्रयानाचे विक्रम लँडर चंद्रावर यशस्वीरीत्या उतरले. या ऐतिहासिक घटनेचा आनंदोत्सव पुणेकरांनी साजरा केला. यावेळी चांद्रयान ३ ची रांगोळी काढून दीपोत्सव करण्यात आला.
राष्ट्रीय कला अकादमी न्यास, श्री लकडी पूल विठ्ठल मंदिर ट्रस्ट, सेवा मित्र मंडळ ट्रस्ट ,साईनाथ मंडळ ट्रस्ट, श्रीहरी कीर्तनोतेजक सभा श्री नारद विद्यामंदिर यांनी एकत्र येत सदाशिव पेठेतील नारद मंदिर येथे हा आनंदोत्सव साजरा केला.
