Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

चांद्रयान ३ मोहीम यशस्वी झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने जल्लोष


पुणे-२३: भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने आज चांद्रयान ३ मोहीम यशस्वी झाल्याबद्दल जंगली महाराज रस्त्यावर फटाके फोडत मिठाई वाटप करत ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला यावेळी शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी खासदार व शहर प्रभारी अमर साबळे, आमदार भीमराव तापकीर ,माजी आमदार बापूसाहेब पठारे, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, माजी शहराध्यक्ष जगदिश मुळीक ,हेमंत रासने,सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे दीपक पोटे संदीप लोणकर यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
यावेळी बोलताना घाटे म्हणाले की ‘चांद्रयान ३ मोहीम यशस्वी होणे हे भारताच्या दृष्टीने खूप अभिमानस्पद आहे भारत आता विश्वगुरु म्हणून ओळखला जात आहे या मोहिमेच्या सर्व शिलेदारांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो’

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading