Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

हिंगण्यातील नाला चोरीला गेला!

पुणे- तळजाई पचगाव पर्वती वन विभाग मधून उगमस्थान असलेला हिंगणे खुर्द सर्वे क्रं ५ मधील नाला पुढे वाहत हिंगण्यातून मुठा नदीला मिळतो, अंदाजे ४० फुटी नैसर्गिक नाला प्रवाह चोरीला गेला असल्याची तक्रार पर्यावरणप्रेमी अनंत घरत यांनी पुणे महानगरपालिकेकडे केली आहे.

गेली अनेक वर्षे विकास आराखड्यात असणारा तसेच पुणे महानगरपालिकाने अधिकृत प्रायमुव्ह संस्थेच्या माध्यमातून केलेल्या सर्वेत नोंद असणारा नैसर्गिक नाला गायब झाला असून तो फक्त आता कागदावरच दिसत आहे. त्याचे पृथ्वीवरील अस्तित्व नाहीसे झाले असून तो चोरीला गेला आहे. अशी दाट शक्यता पर्यावरण प्रेमी अनंत घरत यांनी व्यक्त केली आहे.

पुणे महानगरपालिका प्रशासन आणि विकसक यांच्या आशीर्वादानेच तो गायब झाला आहे. जैवविविधता क्षेत्र (बीडीपी झोन) आरक्षित असताना असे होणे हे जबाबदार प्रशासनाचा कानाडोळा असून या नैसर्गिक नाला चोरीला हे सर्वचजण जबाबदार आहेत. त्यामुळे विकासकासोबत संबंधित अधिकारी वर्गावरपण गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी मागणी पुणे महापालिकेकडे करण्यात आली आहे.
अनंत घरत म्हणाले, “परवानगीशिवाय कोणताही भूविकास होऊ शकत नाही. ही परवानगी तुम्हाला महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना (MRTP) अधिनियम १९६६ अन्वये घ्यावी लागेल. जर हे सर्व काम विनापरवानगी सुरू असेल तर ते बेकायदेशीर आहे. शिवाय, हे जर डोंगरमाथ्यावर किंवा डोंगर उतारावर होत असेल, तर त्याचा जैवविविधतेवर परिणाम होतो आणि त्यामुळे आपत्ती ओढवते. फक्त दंड करून चालणार नाही तर विकासक व जागा मालक यांच्या विरोधात MRTP ऍक्टनुसार अजामीनपात्र गुन्हा अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर दाखल करावा अशी मागणी आम्ही करत आहोत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading