Tuesday, June 16, 2026
BusinessLatest News

एयर इंडियाची अ‍ॅक्सेसरेलशी भागिदारी, युरोपमधील १००+ शहरांत इंटरमोडाल प्रवास सेवा पुरवणार

गुरुग्राम – एयर इंडिया या भारतातील आघाडीच्य आंतरराष्ट्रीय विमानसेवा कंपनीने अ‍ॅक्सेसरेलसह इंटरमोडाल इंटरलाइन करार केला असून त्याअंतर्गत कंपनीच्या प्रवाशांना युरोपमध्ये लहान शहरांत, विमानतळ नसलेल्या ठिकाणीही जास्त चांगली कनेक्टिव्हिटी मिळण्यास मदत होईल.

या करारामुळे एयर इंडियाच्या प्रवाशांना एकाच इंटरमोडाल तिकिटावर रेल्वे आणि बसने शंभरपेक्षा जास्त शहरांत प्रवास करता येणार आहे. त्यामध्ये ऑस्ट्रिया, बेल्जियम, जर्मनी, झेक रिपब्लिक, हंगेरी, इटली आणि इंग्लंड, युरोपियन गेटवेज ऑफ अ‍ॅमस्टरडॅम, बर्मिंगहम, लंडन हिथ्रु, लंडन गॅटविक, मिलान आणि व्हिएन्ना यांचा समावेश आहे. या तिकिटामुळे एयर इंडियाच्या प्रवाशांना विमानसेवेत मिळणारा बॅगेज अलावन्स रेल किंवा बस ऑपरटेर सेवेतही मिळणार आहे.

अ‍ॅक्सेसरेल ही आयटा प्रवास भागीदार असून त्यांचा स्वतःचा डेझिग्नेटर कोड (९बी) असून त्यामुळे एकाच तिकिटावर इंटरमोडाल प्रवास शक्य होणार आहे.

एयर इंडियाचे प्रमुख कमर्शियल आणि ट्रान्सर्फेमशन अधिकारी निपुण अगरवाल म्हणाले, ‘आमच्या जागतिक नेटवर्कचा विस्तार हा एयर इंडियाच्या सध्या सुरू असलेल्या स्थित्यंतराच्या प्रवासातील महत्त्वाचा घटक आहे. अ‍ॅक्सेसरेलसह केलेल्या भागिदारीमुळे आमच्या प्रवाशांना युरोपमधील विविध ठिकाणी सेवा मिळेल तसेच भारत व युरोपमधील कनेक्टिव्हिटी वाढेल.’

‘इंटरमोडाल पद्धतीसह आमच्या नेटवर्कचा विस्तार करण्यातून शाश्वत पर्यावरणाप्रती आमची बांधिलकी दिसून आली आहे,’ असेही विल्सन म्हणाले.

अ‍ॅक्सेसरेलच्या व्यवसाय विकास विभागाचे उपाध्यक्ष अँड्र्यु पॉपस्क्यु म्हणाले, ‘एयर इंडिया- अ‍ॅक्सेसरेल यांच्यातील भागिदारी जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. जागतिक स्तरावर एयर इंडियासह इतर इंटरमोडाल रेल आणि कोच भागिदारांसह सेवा देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. अ‍ॅक्सेसरेलसह भागिदारीमुळे एयर इंडियाला सद्य परिस्थिती आणि भविष्यात आपल्या ग्राहकांना जास्त ठिकाणी सेवा देता येईल.’ एयर इंडियासाठीच्या अ‍ॅक्सेसरेलच्या रेल व बस ऑपरेटर्समध्ये अवंती वेस्ट कोस्ट (युके), ग्रेट वेस्टर्न रेल्वेज (युके), लंडन नॉर्थ इस्टर्न रेल्वेज (युके), नॅशनल एक्सप्रेस (युके), त्रेनितालिया, ओबीबी ऑस्ट्रियन रेल्वेज (ऑस्ट्रिया), एसएनसीबी बेल्जियन रेल्वेज आणि थॅलीज (नेदरलँड्स/बेल्जियम)

सध्या एयर इंडियाची एयरमोडाल तिकिट्स जगभरातील प्रवासी एजंट्सद्वारे बुकिंगसाठी उपलब्ध आहेत. कालांतराने एयरलाइनने ही सुविधा आपल्या विक्री चॅनेल्सद्वारे उपलब्ध करण्याचे ठरवले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading