fbpx
Thursday, December 7, 2023
ENTERTAINMENTLatest News

तलुबाज मध्ये इसाबेलच्या भूमिकेत दिसणार नर्गिस फाखरी !

 रॉकस्टार आणि मैं तेरा हिरो सारख्या आपल्या चित्रपटांनी मन जिंकणारी सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्री नर्गिस फाखरी ही तलुबाज या वेब सिरीजद्वारे तिचे ओटीटी पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.
नर्गिस तिच्या नवीन अवतारात अफलातून दिसत आहे. इसाबेलच्या रूपात तिच्या अप्रतिम दिसण्याने तिच्या चाहत्यांचा उत्साह पुन्हा एकदा जागा झाला आहे. तिच्या अभिनयाची जादू बघण्यासाठी ऑन-स्क्रीन पुन्हा एकदा साक्षीदार होण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.
 या सीरिज च्या शूटिंगने नर्गिसला वाराणसी या मोहक शहरात घेऊन गेले आहे.तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे नर्गिस सेटवरच्या तिच्या प्रवासाची पडद्यामागील झलक शेयर केली आहे. नर्गिस च्या ओटीटी पदार्पणा साठी सगळेच उत्सुक आहेत.

Leave a Reply

%d