स्टेशनरी कटलरी असोसिएशनच्या अध्यक्षपदी सचिन जोशी
पुणे : स्टेशनरी कटलरी अँड जनरल मर्चंटस् असोसिएशनच्या अध्यक्षपदी सचिन जोशी यांची निवड करण्यात आली. गंगाधाम चौकातील महा टेÑड मार्केट येथे असोसिएशनची ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. यावेळी नवनियुक्त पदाधिकारी व कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली.
उपाध्यक्षपदी संजय राठी, सेक्रेटरीपदी किशोर पिरगल, खजिनदार मोहन कुडचे, सल्लागारपदी अरविंद पटवर्धन, दिलीप कुंभोजकर, सुरेश नेऊंरगावकर, सूर्यकांत पाठक, शिरीष बोधनी यांची तर विश्वस्तपदी मदनसिंह रजपूत, मोहन साखरिया, राजेश गांधी यांची निवड करण्यात आली. पुढील तीन वर्षांकरिता २०२३ ते २०२५ या कालावधीसाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे.
