Wednesday, September 2, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

भारताच चंद्रावर यशस्वीरीत्या पाऊल; Chandrayaan 3 ने पाठवला पहिला संदेश

पुणे : भारताचे चांद्रयान 3 (Chandrayaan 3) यशस्वीरीत्या चंद्रावर उतरले. अन् बंगळुरुमधील इस्त्रोच्या कार्यालयापासून संपूर्ण भारतात एकाच जल्लोष झाला. भारतीय वेळेनुसार 6:03 वाजता चांद्रयान 3 (Chandrayaan 3) लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ खाली उतरला अन् चंद्रावर स्थिरावला. विशेष म्हणजे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ पोहोचलेला भारत हा पहिला देश ठरला आहे. यामुळे चांद्रयान 2 चे अपयश मिटवण्यात चांद्रयान 3 मिशनला यश आले असून इस्रोसह भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

भारतासह समस्थ जगाचे लक्ष चांद्रयान 3  (Chandrayaan 3) मोहिमेकडे लागले होते. शेवटचे ते 10 मिनिट सुरू झाले. अन् समस्त भारतीयांनी आपले श्वास रोखून धरले. शेवटी अपेक्षित होत तेच झालं. काही काळण्या आगोदरच चांद्रयान 3 चंद्रावर पोहोचले. अन् इस्रो तील शास्त्रज्ञांसह समस्त भारतीयांचा उर अभिमानाने भरून आला. आता समस्त भारतात चांद्रयान 3 चा जल्लोष सुरू आहे. इतकेच नव्हे तर चांद्रयान 3 (Chandrayaan 3) ने चंद्रावर पोहोचल्यावर एक मेसेज ही पाठवला आहे. “मी चंद्रावर पोहोचलो आहे अन् तुम्ही सुद्धा ” 

 

 

 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading