fbpx
Monday, June 17, 2024
PUNE

मातंग समाजाच्या मागण्यासाठी राज्यभर लढा उभारणार – रमेश बागवे


पुणे, दि. 30 – मातंग समाजाच्या स्वतंत्र आरक्षणा सह विविध मागण्या बऱ्याच वर्षापासून शासनाने प्रलंबित आहेत. त्यासाठी आज मातंग एकता आंदोलन च्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून तीव्र निदर्शने करण्यात आली .त्यावेळी माजी मंत्री रमेश बागवे यांनी मातंग समाजाच्या मागण्यासाठी राज्यभर लढा उभारणार असल्याचे जाहीर केले.

मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण,लहुजी साळवे आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या,लोक शाहीर आण्णा भाऊ साठे महामंळाचे कर्ज माफ करावे, महामंडळाची तत्काळ पुनर्रचना करून चालू करावे, बार्ट्टी च्या धर्तीवर आर्ट्टी ची स्थापना करावी, संगमवाडी येथील क्रंतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक लवकरात लवकर सुरू करावे,आण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न देण्यात यावा, अट्रोसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, चिरानगर येथील आण्णा भाऊ साठे यांचे स्मारक उभा करावे, कै.संजय ताकतोडे यांच्या कुटुंबियाना मदत करावी या मागण्यासाठी मातंग एकता आंदोलन च्या वतीने आज तीव्र आंदोलन करण्यात आले.

या वेळी कार्यकर्ते व महिला यांच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. या आंदोलनाचे नेतृत्व माजी मंत्री व मातंग एकता आंदोलनाचे संस्थापक रमेश बागवे यांनी केले होते.या वेळी प्रदेश कार्याध्यक्ष, नगरसेवक अविनाश बागवे, शहराध्यक्ष विठ्ठल थोरात, सुरेखा खंडागळे, दयानंद अडागळे, अनिल हतागले, रमेश सकट,सुरेश अवचिते, अरुण गायकवाड, राजू गायकवाड, सुनील बावकर,बहुसेन शेख, त्रिंबक अवचीते, विशाल कसबे, नारायण पाटोळे, रावसाहेब खवले, मारुती कसबे यासह शहरातील कार्यकर्ते, महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading