कोरोनामुळे सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू

पुणे, दि. 24 – कोरोनामुळे शहर पोलीस दलातील आणखी एका सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाला आहे. सहायक पोलीस उपनिरीक्षक विलास सरवदे (वय 55) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.

विलास सरवदे हे चतु:शृंगी पोलीस ठाण्यात नेमणुकीस होते. एक महिन्यांपूर्वी त्यांना त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल केले होते. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे पुणे पोलीस दलातील बळींची संख्या आठवर पोहोचली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: