जे.पी. मॉर्गन यांच्या सहकार्याने सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिवर्सिटी तर्फे भविष्यातील तंत्रज्ञानावर कौशल्य प्रशिक्षण सुरू

पुणे, दि. २१ –   सिम्बायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटी (एसओईएस)ह्या शिक्षण आणि कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित करणार्‍या शैक्षणिक ट्रस्टने जे.पी. मॉर्गनच्या सहकार्याने ने ,०००  विद्यार्थ्यांंना  प्रशिक्षण देण्याची घोषणा केली आहे. हे प्रशिक्षण सिंबायोसिस स्किल्स आणि प्रोफेशनल युनिवर्सिटी पुणे तर्फे घेतले जाईल.जे विद्यार्थी ( प्रामुख्याने विद्यार्थीनी) ज्यांना असे प्रशिक्षण उपलब्ध नसते किंवा जे ग्रामीण भागातील आहेत, आर्थीकदुष्या दुर्बल घटकातील आहे आणि ज्यांना नवीन तंत्रज्ञान क्षेत्रात करियर घडविण्याची इच्छा आहे अश्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

 

हा प्रकल्प सिम्बायोसिस स्किल्स आणि प्रोफेशनल युनिवर्सिटीपुणे कॅम्पसमध्ये राबविला जाईल . तंत्रज्ञानातील करिअरची इच्छा असणार्या विद्यार्थ्यांठी व अनेक क्षेत्रांमधील रोजगारांच्या गरजा लक्षात घेता आवश्यक कौशल्ये पुरवण्यासाठी तयार केलेले कोर्सेस येथे उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमांमध्ये डेटा सायन्समशीन लर्निंगऑटोमेशनब्लॉकचेन टेक्नॉलॉजीज आणि ऑगमेंटेड आणि वर्चुअल रिअ्ॅलिटीचा समावेश आहे.

 

पुणे-मुंबई द्रुतगती महा-मार्गावरील किवळे येथील सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिवर्सिटी मध्ये शैक्षणिक  उद्योग-तज्ञ यांच्या मार्फत हे अभ्यासक्रम तयार कले आहेत. विद्यार्थ्याना प्रशिक्षित करण्यासाठी  कौशल्य-आधारित शिक्षण पद्धत्ती द्वारे शिकवले जाईल. कौशल्य विकसित करण्यावर या  प्रशिक्षणाचा भर असेल. हे अभ्यासक्रम आज बाजारात उपलब्ध असलेल्या नोकर्यांना अनुरुप आहेत. अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्याना रोजगाराच्या संधी साठी मेन्टॉरींग व प्लेसमेंट सहाय्य देखील प्रदान केले जाईल.   

 

या संदर्भात विद्यापीठाच्या प्रो-चांसलर डॉ. स्वाती मुजुमदार यांनी सांगितले, “विद्यार्थ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे.  सध्याच्या बाजाराची परिस्थिती आणि कोविडनंतरचा काळ लक्षात घेता अभ्यासक्रमांचे आराखडे काळजीपूर्वक तयार केले गेले आहेत. विद्यार्थ्याना रोजगार देऊन सक्षम बनविण्यासाठी ही हाय-टेक कौशल्ये विकसित करण्यासाठी विद्यापीठ कटिबद्ध आहे. अभ्यासक्रम विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विनामूल्य आणि पूर्णवेळ शिकविले जातील. 

 

जे.पी मॉर्गन सीएसआर इंडियाच्या प्रमुख मनीषा चड्ढा म्हणाल्या, “जे.पी. मॉर्गन वंचित पार्श्वभूमीतील तरुणांना रोजगाराभिमुक प्रशिक्षण देण्यास वचनबद्ध आहे या कार्यक्रमाद्वारे तरुणांना  तंत्रज्ञानाची कौशल्ये प्रदान करण्याचे आमचे लक्ष्य आहे, जी त्यांना भविष्यातील  उद्योगांच्या आवश्यकता पूर्ण करण्यास सक्षम बनवतील, 

Leave a Reply

%d bloggers like this: