IPL2020 – सुपर ओव्हरमध्ये दिल्लीची पंजाबवर मात

आयपीएलमधील दुसरा सामना आज दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब संघात झाला. सुपर ओव्हरपर्यंत गेलेल्या या लढतीत दिल्लीच्या संघाने पंजाबचा पराभव केला. सुपर ओव्हरमध्ये पंजाबने फक्त 2 धावा केल्या. दिल्लीने हे आव्हान लीलया पार करत पहिल्या विजयाची नोंद केली.

याआधी दिल्लीच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 157 धावा करत पंजाबपुढे 158 धावांचे आव्हान ठेवले. दिल्लीच्या दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचा संघ 20 षटकात 8 बाद 157 धावा करू शकला. मयांक अग्रवालने 89 धावांची झुंजार खेळी केली. मात्र विजयासाठी 2 चेंडूत 1 धाव बाकी असताना तो बाद झाला आणि अखेरच्या चेंडूवर जॉर्डनही बाद झाल्याने सामना टाय झाला.

तत्पूर्वी दिल्लीकडून मार्कस स्टॉयनिस याने 21 चेंडूत तडाखेबाज 53 धावांची अर्धशतकीय खेळी केली, तर कर्णधार श्रेयस अय्यर याने 39 आणि ऋषभ पंत याने 31 धावांचे योगदान दिले.

दिल्लीची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. शिखर धवन, पृथ्वी शॉ आणि हॅटमायर हे 3 खेळाडू 1 धावांवर बाद झाले. यानंतर पंत आणि अय्यर यांनी डाव सावरत 50 धावांची भागीदारी केली. अखेरच्या षटकामध्ये स्टॉयनिसने तुफानी फलंदाजी करत दिल्लीला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. पंजाबकडून शमीने सर्वाधिक 3, कॉटरेलने 2 आणि बिश्नोइ याने 1 बळी घेतला.

Leave a Reply

%d bloggers like this: