IPL2020 – विराट सेनेची विजयी सुरुवात; हैद्राबादचा 10 धावांनी पराभव

दुबई – आयपीएल 2020 च्या तिसऱ्या सामन्यात टॉस गमावून पहिले फलंदाजी करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने 20 ओव्हरमध्ये दिलेल्या 164 धावांच्या प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादला 153 धावांपर्यंत मजल मारता आली आणि ऑलआऊट झाली. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या सामन्यात आरसीबीने 10 धावांनी विजय मिळवत आयपीएलची विजयी सुरुवात केली. युजवेंद्र चहल आरसीबीचा स्टार गोलंदाज ठरला. चहलने हैदराबादक फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले आणि 4 ओव्हरमध्ये 18 धावा देत 3 विकेट घेतल्या. नवदीप सैनी, शिवम दुबे यांनी प्रत्येकी 2 विकेट, डेल स्टेनला 1 विकेट मिळाली. हैदराबादकडून जॉनी बेअरस्टोने अर्धशतकी डाव खेळला, पण तो टीमला विजय मिळवून देण्यासाठी पुरेसा नव्हता.

हैदराबादकडून सलामीला कर्णधार डेविड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो उतरले आहेत. दोघे सावध खेळ करत असताना दुसऱ्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर वॉर्नर दुर्दैवीपणे धावबाद झाला. वॉर्नर 6 धावच करू शकला वॉर्नर बाद झाल्यावर आलेल्या मनीष-बेअरस्टो यांनी 71 धावांची भागीदारी केली आणि संघाचा डाव सावरला. मात्र चहलने मनीषला 34 धावांवर बाद केलं आणि टीमला मोठी विकेट मिळाली. मनीष बाद झाल्यावर हैदराबादची घसरगुंडी सुरूच राहिली. बेअरस्टोने 37 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं, पण चहलने 16व्या ओव्हरमध्ये बेअरस्टोला 61 धावांवर बाद केलं आणि नंतर विजय शंकरलाही माघारी धाडले. त्यानंतर हैदराबादकडून पदार्पण करणाऱ्या प्रियम गर्ग दबाव हाताळू शकला नाही आणि 12 धावांवर हिट विकेट बाद झाला. दुबेच्या गोलंदाजीवर हेल्मेटला लागलेला चेंडू स्टम्पवर आदळला. अभिषेक शर्माने 7 धावा केल्या, तर राशिद खान 6 धावांवर रनआऊट झाला. नवदीप सैनीने भुवनेश्वर कुमारला भोपळाही फोडू न देता बोल्ड करून माघारी पाठवले.

Leave a Reply

%d bloggers like this: