बॉलीवुड ड्रग्ज प्रकरण- सारा आणि श्रद्धाचे व्हॉट्सएप चॅट उघड

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनमध्ये नवे खुलासे होत आहेत. याप्रकरणी बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांना समन्स पाठवण्यात येणार आहे. एनसीबीच्या तपासात व्हॉट्सएप चॅट समोर आले आहेत. चॅटमध्ये ड्रग्ज संदर्भात यामध्ये चर्चा सुरु आहे. एनसीबीच्या सुत्रांनुसार श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर आणि सुशांतची टॅलेंट मॅनेजर राहीलेल्या जया शाह यांच्यातील ही चॅट आहे.

सारा अली खानने सुशांत सिंह राजपूतसोबत केदारनाथमध्ये काम केलं होता. तर श्रद्धा कपूरने त्याच्यासोबत छिछोरेमध्ये काम केलं होतं. पुण्यातील डॅमजवळ अभिनेत्रींच्या पार्ट्या व्हायच्या ही माहीती समोर आलीय. रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सुशांतचा नोकर दीपेश सावंत यांना अटक करण्यात आलीय. 

एनसीबीला दिलेल्या स्टेटमेंटमध्ये रियाने सांगितलं की, सुशांत एक ड्रग एडिक्ट झाला होता. तो यामधून बाहेर पडू शकत नव्हता. याच कारणामुळे तिने सुशांतचं घर सोडलं. या दरम्यान लॉकडाऊन आणि सुशांतवर लावण्यात आलेल्या मीटूच्या आरोपावरून तिच्या लक्षात आलं हों की, ती सुशांतसोबत राहिली तर तिचं करिअर खराब होऊ शकतं. यामुळे सुशांतला सोडणंच तिला योग्य वाटलं. 

Leave a Reply

%d bloggers like this: