भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली, 10 जणांचा मृत्यू

मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत – एकनाथ शिंदे यांची घोषणा

भिवंडी – मुंबईपाठोपाठ ठाणे जिल्ह्यातही इमारत दुर्घटना घडली आहे. ठाण्यातील भिंवडीमध्ये तीन मजली इमारत कोसळून १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत ढिगाऱ्याखालून ११ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. तरीही ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून सध्या एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाकडून याठिकाणी बचावकार्य सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी शहरातील धामणकर नाका पटेल कंपाऊंड या भागात असलेली ‘जिलानी’ ही इमारत पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे भूईसपाट झाली. आज पहाटे ३.४०च्या सुमारास ही दुर्घटना घडली. पहाटेच्या वेळी ही दुर्घटना घडल्याने अनेक नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या इमारतीचा एक भाग पूर्ण कोसळला असून दोन मजले हे जमिनीखाली गाडले गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. तसेच परिस्थिती चा आढावा घेतला आणि मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा केली आहे.

मृत व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे
१) झुबेर खुरेशी(पु/३० वर्ष)
२)फायजा खुरेशी(पु/५वर्ष)
३)आयशा खुरेशी(स्री/७वर्ष)
४)बब्बू(पु/२७वर्ष)
५) फातमा जुबेर बबु (स्त्री/२वर्ष)
६) फातमा जुबेर कुरेशी (स्त्री/८वर्ष)
७) उजेब जुबेर (पु/६ वर्ष)
८) असका आबिद अन्सारी (पु/१४ वर्ष)
९) अन्सारी दानिश अलिद (पु/१२ वर्ष)
१०) सिराज अहमद शेख (पु/२८ वर्ष)

आतापर्यंत सुखरूप सुटका करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे
१) हेदर सलमानी( पु/२०वर्ष)
२) रुकसार खुरेशी(स्त्री/२६ वर्ष)
३) मोहम्मद अली(पु/६० वर्ष)
४) शबीर खुरेशी(पु/३० वर्ष)
५) मोमीन शमीऊहा शेख (स्त्री/४५ वर्ष)
६) कैसर सिराज शेख (स्त्री/२७ वर्ष)
७) रुकसार जुबेर शेख ( स्त्री/ २५वर्ष)
८) अबुसाद सरोजुद्दीन अन्सारी (पु/१८ वर्ष)
९) आवेश सरोजुद्दीन अन्सारी (पु/२२ वर्ष)
१०) जुलेखा अली शेख (स्त्री/५२ वर्ष)
११) उमेद जुबेर कुरेशी (पु/४वर्ष)

Leave a Reply

%d bloggers like this: