‘आई माझी काळूबाई’ मालिकेतील २७ कलाकार कोरोना पॉझिटिव्ह

सातारा – अनलॉकच्या प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर मालिका आणि चित्रपटांच्या चित्रीकरणालाही सुरुवात झाली आहे. मात्र, चित्रिकरणादरम्यान, अनेक कलाकरांना कोरोनाची लागण होत असल्याचं समोर आलंय. आता सोनी मराठीवरील काळूबाईच्या नावानं चांगभलं या मालिकेतील सेटवरील तब्बल २७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर,ज्येष्ठ अभिनेेत्री आशालता वाबगावकर यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलंय.

एका डान्सचा ग्रुप त्यांच्या संपर्कात आला होता. या ग्रुपमध्ये एका कलाकाराला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे इतर कलाकारांनाही कोरोनाची लागण झाली. इतर २६ कलाकारांची प्रकृती व्यवस्थित असून ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांची प्रकृती चिंताजन आहे. त्यांना साताऱ्यातील रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलंय. तर, कोरोनाचा संसर्ग झाल्याने साताऱ्यातील चित्रीकरण थांबवलं आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: