Thursday, June 18, 2026
PUNE

पुणे विभाग – 3 लाख 72 हजार 984 कोरोना बाधित रुग्ण बरे, विभागात कोरोना बाधित 2 लाख 84 हजार 581 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे, दि.20 – पुणे विभागातील 3 लाख 72 हजार 984 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 लाख 84 हजार 581 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 78 हजार 751 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 9 हजार 652 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.59 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 76.30 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 48 हजार 501 रुग्णांपैकी 2 लाख 344 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 42 हजार 639 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 518 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.22 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 80.62 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 29 हजार 115 रुग्णांपैकी 19 हजार 866 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 421 आहे. कोरोनाबाधित एकूण 828 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 28 हजार 202 रुग्णांपैकी 19 हजार 553 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 634 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 28 हजार 521 रुग्णांपैकी 17 हजार 633 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 818 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 70 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 38 हजार 645 रुग्णांपैकी 27 हजार 185 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 10 हजार 239 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 221 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 7 हजार 13 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 3 हजार 985, सातारा जिल्ह्यात 962, सोलापूर जिल्ह्यात 521, सांगली जिल्ह्यात 830 तर कोल्हापूर जिल्ह्यात 715 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 16 लाख 26 हजार 612 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 3 लाख 72 हजार 984 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 19 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading