कॅडबरी डेअरी मिल्कचा धावफलकापलीकडील प्रत्येक धाव मोजण्यासाठी मुंबई इंडियन्ससोबत सहयोग

 भारत क्रिकेटच्या हंगामासाठी सज्ज होत असताना, माँडेलीझ इंडियाच्या कॅडबरी डेअरी मिल्क या प्रतिष्ठेच्या ब्रॅण्डने मुंबई इंडियन्स संघासोबत त्यांचा अधिकृत गुडनेस पार्टनर म्हणून सहयोग करार केला आहे. ज्यांची दखल घेतली जात नाही, त्यांची दखल घेण्याचा संदेश “#SayThankYou” उपक्रमाच्या माध्यमातून प्रसारित करण्यासाठी हा सहयोग करण्यात आला आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून ब्रॅण्ड मुंबई इंडियन्सने सामन्यांमध्ये केलेल्या एकूण धावा दुप्पट करेल आणि आपली सहयोगी स्वयंसेवी संस्था निर्माणच्या माध्यमातून रोजंदारी कामगारांसाठी आरोग्यविमा प्रायोजित करेल. 

माँडेलीझ इंडियाच्या मार्केटिंग (चॉकलेट्स), इनसाइट्स अँड अॅनालिटिक्स विभागाचे वरिष्ठ संचालक अनिल विश्वनाथन या भागीदारीबद्दल म्हणाले, “औदार्याच्या छोट्याशा कृतीचे परिणाम खूप दूरवर पोहोचतात असे कॅडबरी डेअरी मिल्कला एक आशावादी व प्रगतीशील ब्रॅण्ड म्हणून नेहमीच वाटत आले आहे. बरेचदा छोट्याशा कृतीचा प्रभाव खूप मोठा असतो. या वर्षाने आपल्याला आपले शहर, सोसायट्या, आयुष्ये चालवणाऱ्या लोकांचे मूल्य समजावून दिले आहे आणि ब्रॅण्डच्या #SayThankYou अभियानाचा गाभा हाच आहे. क्रिकेट हे भारतीयांचे प्रेम असल्याने आम्हाला टी-२० क्रिकेटच्या व्यासपीठाचा उपयोग करून आमच्या ग्राहकांना “आपली आयुष्ये सोपी करणाऱ्यांचे आभार मानण्यास” प्रेरणा द्यायची होती. तेव्हा या हंगामात मुंबई इंडियन्सने काढलेली प्रत्येक धाव ही धावफलकाच्या पलीकडे जाणार आहे. दुर्लक्षितांची दखल घेण्याच्या आणि संघ बांधण्यासाठी व खेळाडूंच्या मैदानावरील यशासाठी पडद्यामागे काम करणाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या या प्रवासात मुंबई इंडियन्ससारखा देशाचा आवडता संघ सामील झाल्यामुळे आमचा उत्साह वाढला आहे.

आरोग्यविमा ही असंघटित कामगारांसाठी निर्णायक स्वरूपाची गरज आहे आणि निर्माणच्या माध्यमातून आरोग्यविमा प्रायोजित करून दुर्लक्षितांची दखल घेण्यासाठी कॅडबरी डेअरी मिल्क काम करत आहे. कॅडबरी डेअरी मिल्कने आपल्या लिमिटेड एडिशन ‘थँक यू’ बारच्या विक्रीतील उत्पन्नाचा भाग १७,००० रोजंदारी कामगारांच्या विम्यापोटी देण्याचा वायदा ज्या जनरॉसिटी प्रवासामध्ये केला आहे, त्याचाच हा पुढील भाग आहे.

मुंबई इंडियन्स संघाचे प्रवक्ते या सहयोगाबद्दल म्हणाले, “कॅडबरी डेअरी मिल्कसोबत सहयोग केल्याबद्दल आम्ही अत्यंत आनंदी आहोत. अनुकंपा, कृतज्ञता व एकता या तत्त्वांवर मुंबई इंडियन्सचा विश्वास आहे. मुंबई इंडियन्सच्या ‘वन फॅमिली’ विचारसरणीत खऱ्या चैतन्याच्या याच भावनेचे प्रतिबिंब दिसते. कॅडबरी डेअरी मिल्कचा ‘से थँक यू’ उपक्रम खूपच प्रशंसनीय असून, आमचे विचार त्याच्याशी जुळणारे आहेत. सध्या जग एवढ्या आव्हानात्मक काळातून चालले आहे की, आपण याचा फटका बसलेल्यांची काळजी घेणे, त्यांना सहानुभूती दाखवणे अत्यावश्यक आहे. या सहयोगाच्या माध्यमातून आपण गरजूंच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकू, त्यांना मदत करू शकू, अशी आशा आम्हाला वाटते.”

Leave a Reply

%d bloggers like this: