रकुल प्रीत सिंगने घेतली हायकोर्टात धाव

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्ये प्रकरणी कसून चौकशी सुरू आहे. याप्रकरणी सध्या बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शन हा मुद्द चांगलाच गाजताना दिसत आहे. सुशांतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीने चौकशी दरम्यान ड्रग्स प्रकरणामध्ये अभिनेत्री सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंगचं नाव घेतलं. त्यानंतर रकुल प्रितने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी रकुल प्रीतचे नाव घेवू नये असे निर्देश माहिती व प्रसारण मंत्रालयाने प्रसारमाध्यमांना द्यावे, असं या याचिकेत नमूद करण्यात आले आहे. 

त्याचप्रमााणे रिया चक्रवर्ती ड्रग्स प्रकरणी जोडल्या गेलेल्या कार्यक्रमांच्या प्रक्षेपणावर देखील तिने स्थगिती आणण्याची मागणी केली आहे. त्यामुळे कोर्टाने केंद्र, प्रसार भारती आणि पत्रकार परिषद यांना लवकरात लवकर निर्णय घेण्यास सांगितले आहे. 

दरम्यान ड्रग्स प्रकरणामध्ये रियाने सर्व प्रथम अभिनेत्री सारा अली खान, त्यानंतर रकुल प्रीत सिंगचे नाव घेतले आहे. त्याचप्रमाणे  डिझायनर सिमोन खंभाटा, सुशांतची मैत्रीण आणि रेनड्रॉप मीडियाची फाऊंडर रोहिणी अय्यर आणि ‘दिल बेचारा’ चित्रपटाचा दिग्दर्शक मुकेश छाब्रा यांचे नाव घेतले आहे. 

Leave a Reply

%d bloggers like this: