शिवसंग्रामच्या वतीने पत्रकार बांधवांसाठी मोफत रुग्णवाहिका-एम.व्ही.आर. फाऊंडेशनचे सहकार्य
पुणे : पुण्यामध्ये वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने कोरोनाबाधीत पत्रकार पांडुरंग रायकर यांचा दुर्देवी मृत्यू झाला. त्यामुळे शिवसंग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष विनायकराव मेटे यांच्या आदेशानुसार शिवसंग्राम संघटना व एम.व्ही.आर. फाऊंडेशनच्या वतीने पुणे शहरातील पत्रकार बंधू व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी मोफत रुग्णवाहिका पुणे श्रमिक पत्रकार भवन पुणे यांना प्रदान करण्यात आली.
यावेळी पुणे पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, खजिनदार सुनील जगताप,डॉ. विजय रमानन, शिवसंग्रामचे शहराध्यक्ष भरत लगड, प्रदेश सचिव शेखर पवार, प्रदेश प्रवक्ता तुषार काकडे, डॉक्टर सेल महाराष्ट्र प्रदेशचे समीर निकम, सामाजिक न्याय पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरण ओहोळ, पुणे शहर महिला अध्यक्षा कालिंदी गोडांबे, सुजाता ढमाले, निशा गायकवाड, सचिन दरेकर, किशोर मुळीक, दिलीप पेटकर, पराग निकम, संजय लोंढे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
भरत लगड म्हणाले, पत्रकार हे कोरोनायोद्धा आहेत. आपल्या जीवाची पर्वा न करता ते काम करीत असतात. वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाला, त्या पार्श्वभूमीवर शिवसंग्रामच्यावतीने रुग्णवाहिका देण्यात आली. रुग्णवाहिकेच्या डिझेल आणि ड्रायव्हर खर्च शिवसंग्राम संघटना करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
