Wednesday, September 2, 2026
PUNE

तालाचे गणित समजून घ्यावे – तालयोगी सुरेश तळवलकर 

अंकनाद ‘आयोजित ‘गणित आणि संगीत ‘ विषयावरील “ सांगीतिक गणिती गप्पा “ चा समारोप  

पुणे, दि. 13 ; ‘ताल ही ठेक्याची पहिली बंदीश आहे . तबला वादनाच्या प्रत्येक प्रकारात हजारो बंदिशी आहेत ,विस्तार आहेत . या सगळ्यामागे तालाची भूमिका आहे . ठेक्याच्या रूपाने आपण आवर्तन प्रस्थापित करतो . त्यामागे सगळी गणिती भूमिका असते. हे गणित समजून घ्यायला हवे’, असे प्रतिपादन  तालयोगी सुरेश तळवलकर  यांनी केले. 

‘गणित आणि संगीत’ या विषयावर ‘अंकनाद ‘ या अॅपतर्फे ११ सप्टेबर पासून ‘सांगीतिक गणिती गप्पा’ आयोजित करण्यात आल्या आहेत.१३  सप्टेंबर रोजी तालयोगी सुरेश तळवलकर   यांच्याशी प्राची साठे यांनी  संवाद साधला.  

सुरेश तळवलकर म्हणाले ,’बुद्धी आणि शरीराची गरज भासत नाही अशा क्षणी नाद जन्माला येतो . तालक्रिया ही गणिती आहे. मात्रा ,ताल या सर्वामागे गणित आहे. ३६४ ताल उत्तर हिंदुस्थानी संगीतात मांडले गेले आहेत. कलाकार स्वतः काही ताल जन्माला घालतात . त्यात गणिती भूमिका अतिशय महत्वाची आहे. तालाच्या आत मात्रा आणि मात्रेच्या आत लघुमात्रा असा हा सांगीतिक प्रवास आहे . ठेक्याच्या रूपाने आपण आवर्तन प्रस्थापित करतो . त्यामागे सगळी गणिती भूमिका असते. पाढे म्हणताना नादरूपाने ते सोपे होतात ,हा नादाचा उपयोग आहे. शरीर ,बुद्धी ,मन आणि आत्मा तादात्म्य पावले की  संगीत तयार होते. 

‘वाद्य शिकताना, चाल लावताना गणिती अभ्यासाचा उपयोग होतो. संगीताच्या माध्यमातून बुद्धीचा गणितीय ठेवा निर्माण करणे शिकणे शक्य आहे, दैनंदिन अध्यापनात याचा समावेश करायला हवा. शिक्षकांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा.मुलांच्या मनात अंकांचे स्थान निर्माण झाले पाहिजे ‘,असे प्राची साठे यांनी सांगितले .   

‘गणित आणि संगीत’ या विषयावर ‘अंकनाद ‘ या अॅपतर्फे ‘सांगीतिक गणिती गप्पा’ आयोजित करण्यात आल्या होत्या .११ ते १३ सप्टेबर दरम्यान सकाळी ११ वाजता वेबिनार चे आयोजन करण्यात आले होते .११ सप्टेंबर रोजी चारुदत्त आफळे यांनी संवाद साधला. चारुदत्त आफळे यांच्यानंतर या वेबिनारमध्ये १२ सप्टेंबर रोजी संगीतकार अशोक पत्की,१३ सप्टेंबर रोजी तालयोगी सुरेश तळवलकर यांनी  मार्गदर्शन केले .  

‘अंकनाद ‘ अॅपचे निर्माते मंदार नामजोशी यांनी उपक्रमांची माहिती दिली.’अंकनाद’ हे गणिताकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन देणारं  अॅप   आहे. रोजच्या जगण्यात गणिताला पर्याय नाही . गणित विषय रंजक करुन सांगण्याचे विविध उपक्रम ‘ अंकनाद ‘ तर्फे केले जातात,गणिताची आवड निर्माण केली जाते ,असे त्यांनी सांगितले.एकदा पाठ केलेले अंक नाद स्वरूपामुळे आयुष्यभर लक्षात राहतात. स्मरणशक्ती वाढते. 

‘अंक नाद’चे संचालक पराग गाडगीळ यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील मान्यवर ,शिक्षक ,विद्यार्थी सहभागी झाले. निर्मिती नामजोशी यांनी प्रास्ताविक केले.   

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading