Tuesday, June 16, 2026
MAHARASHTRAPUNETOP NEWS

राज्यात रविवारी 22 हजार 543 नवीन कोरोना पॉझिटिव्ह; 416 जणांचा मृत्यू

पुण्यात दिवसभरात 1978 रुग्ण, 63 जणांचा मृत्यू

मुंबई, दि. 13 – राज्यात कोरोना प्रादुर्भाव सातत्याने वाढताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात २२ हजार ५४३ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४१६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १० लाख ६० हजार ३०८ वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत २९ हजार ५३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या २४ तासांत ११ हजार ५४९ रुग्ण बरे होऊ घरी गेले असून आातपर्यंत एकूण ७ लाख ४० हजार ६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६९.८ टक्के एवढे झाले आहे. तर सध्याचा मृत्यूदर २.७० टक्के एवढा आहे.

आज पर्यंत तपासण्यात आलेल्या ५२ लाख ५३ हजार ६७६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १० लाख ६० हजार ३०८ (२०.१८टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १६ लाख ८३ हजार ७७० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर ३७ हजार २९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच सध्या राज्यात २ लाख ९० हजार ३४४ Active रुग्ण आहेत.

पुणे 13 सप्टेंबर
…….

  • दिवसभरात १९७८ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  • दिवसभरात १५८७ रुग्णांना डिस्चार्ज.
  • पुण्यात ६३ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू. १८ रूग्ण पुण्याबाहेरील.
  • ९१० क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात ४४० रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
  • पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ११९६५७.
  • पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १७७८८.
  • एकूण मृत्यू -२७९३.
    -आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज- ९९०७६.
  • आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ६७७०.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading