Friday, October 23, 2026
MAHARASHTRA

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा – रामदास आठवले

मुंबई, दि. 13 – शिवसैनिकांनी निवृत्त नौदल अधिकाऱ्याला केलेल्या मारहाणीनंतर आता राज्यात राजकारणाला सुरुवात झाली आहे. या मुद्द्यावरुन विरोधक शिवसेनेला आणि महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपच्या आंदोलनानंतर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी निवृत्त अधिकारी मदन शर्मा यांच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना महाराष्ट्रातील वातावरण गढूळ झालं असून महाविकास आघाडी सरकार बरखास्त करुन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी केली.

मदन शर्मा यांच्यावर झालेला हल्ला हा जीवघेणा हल्ला होता. त्या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी कलम ३०७, ३२६ अन्वये गुन्हा दाखल करणे आवश्यक होते. मात्र, या कलमाखाली गुन्हा दाखल न केल्यामुळे हल्लेखोरांना त्वरित जामीन मिळाला, असं आठवले यांनी म्हटलं. कंगना राणावतलाही अंमली पदार्थांच्या गुन्ह्यात अडकविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे राज्यात वातावरण गढूळ झाले आहे. सूडबुद्धीने वागणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला बरखास्त केले पाहिजे अशी मागणी पुढे आली आहे. हे राज्य सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी, या मागणीला माझा पाठिंबा असून त्यासाठी आपण केंद्रात प्रयत्न करणार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading