Wednesday, June 17, 2026
PUNETOP NEWS

पुणे विभाग – 2 लाख 21 हजार 488 कोरोना बाधित रुग्ण बरे, विभागात कोरोना बाधित 2 लाख 99 हजार 397 रुग्ण-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे,दि.10 :- पुणे विभागातील 2 लाख 21 हजार 488 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले.  विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 लाख 99 हजार 397 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 70 हजार 102 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 7 हजार 807 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.61 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 73.98 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 6 हजार 290 रुग्णांपैकी 1 लाख 63 हजार 71 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 38 हजार 536 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 683 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.27 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 79.05 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 20 हजार 530 रुग्णांपैकी 12 हजार 189 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 784 आहे. कोरोनाबाधित एकूण 557 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 22 हजार 133 रुग्णांपैकी 15 हजार 917 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 342 आहे. कोरोनाबाधित एकूण 874 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 19 हजार 260 रुग्णांपैकी 10 हजार 300 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 225 आहे. कोरोनाबाधित एकूण 735 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 31 हजार 184 रुग्णांपैकी 20 हजार 11 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 10 हजार 215 आहे. कोरोनाबाधित एकूण 958 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 8 हजार 513 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 4 हजार 885 सातारा जिल्ह्यात 921, सोलापूर जिल्ह्यात 466, सांगली जिल्ह्यात 979 तर कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 262 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 13 लाख 67 हजार 930 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 2 लाख 99 हजार 397 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading