Tuesday, June 16, 2026
NATIONALPUNETOP NEWS

कोरोना – सीरम इन्स्टिट्युटच्या लसीच्या ट्रायल्स थांबवण्यात आल्या

पुणे, दि. 10 – कोरोनाचा संसर्ग पाहता लवकरात लवकर लस तयार होणं फार गरजेचं आहे. मात्र, त्यातच सीरम इन्स्टिट्युटने कोरोना लसीवर ट्रायल्स थांबवल्या आहेत. याबाबत, सीरमने एका निवेदनाद्वारे माहिती दिली की, “आम्ही परिस्थितीचा आढावा घेत आहोत, अ‍ॅस्ट्रॅजेनेका चाचण्या पुन्हा सुरू करेपर्यंत भारताच्या चाचण्या थांबवित आहोत. आम्ही डीसीजीआयच्या सूचनांचे पालन करीत आहोत. त्यामुळे यापुढे यावर भाष्य करणार नाही. या संदर्भात अधिक माहितीसाठी डीसीजीआयशी संपर्क साधावा.

जगभरात कोरोनाने थैमान माजवले आहे. त्यामुळे अनेक देशांनी कोरोनावर प्रभावी लस शोधून काण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. कोरोनाव्हायरसच्या खात्‍म्यासाठी सर्वाधिक अपेक्षा वाढवलेल्या ऑक्‍सफर्डच्या AZD1222 लसीची तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील चाचणी रोखण्यात आली आहे. ब्रिटनमध्ये एका व्यक्तिला ऑक्‍सफर्डने बनवलेली कोरोनाव्हायरसवरील लस टोचण्यात आली होती. त्याच्या शरारीवर दुष्परिणाम झाल्याचं समोर आलं. यानंतर ही कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी थांबवण्यात आली आहे. मात्र, भारतातील चाचण्या सुरुच राहणार असल्याने सीरम इन्स्टिट्यूटने काल सांगितलं होतं. मात्र, आज पुन्हा या चाचण्या थांबवण्यात आल्याचे सांगितले आहे.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि ब्रिटिश-स्वीडिश कंपनी अॅस्ट्राजेनिकाची ही लस संपूर्ण जगासाठी आशेचा किरण बनली होती. ब्रिटनमध्ये या लसीच्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीदरम्यान एका व्यक्तीच्या शरीरावर गंभीर दुष्‍परिणाम दिसू लागले. गंभीर दुष्परिणाम म्हणजे लस किंवा औषध दिल्यानंतर त्याला रुग्णालयात जावं लागलं.

लसीमु‌ळे एक रुग्ण आजारी पडल्याने त्याच्या शरीरावर नेमका काय दुष्परिणाम झाला हे अजून स्पष्ट झालेलं नाही. मात्र हा रुग्ण लवकरच बरा होईल, अशा विश्वास या प्रकरणाशी संबंधित एका व्यक्तीने व्यक्त केला. खरंतर लसी बनवण्याची प्रक्रिया सुरु असताना चाचणी थांबवणं किंवा रोखणं ही बाब नवी नाही. परंतु भारतासह जगभरात कोरोनाव्हायरसचा कहर सुरु असताना लवकरात लवकर त्याच्यावरील लस तयार करण्याच्या प्रयत्नांना मोठा झटका बसला आहे. ही लस बनवण्यात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि एस्ट्राजेनिका आघाडीवर होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading