सारेगमकडून कारवाँ मिनी मराठी सादर
मुंबई, दि. 7- कारवाँ मिनी तमिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम, बंगालीच्या भव्य यशानंतर सारेगम मराठी गाण्यांच्या प्रचंड संग्रहासह ‘कारवाँ मिनी – मराठी‘ सादर करत आहे.
कारवाँ मिनी मराठीमध्ये लता मंगेशकर, सुमन कल्याणपूर, पंडित हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, आशा भोसले, सुधीर फडके, सुरेश वाडेकर, जयवंत कुलकर्णी, सुलोचना चव्हाण, महेंद्र कपूर, डॉ. वसंतराव देशपांडे, पंडित शरद जांभेकर, हेमंत मुखर्जी, चंद्रकांत काळे अशा दिग्गज गायकांनी गायलेली ३५१ प्री–लोडेड सहाबहार मराठी गाणी आहेत.
या प्री–लोडेड गाण्यांमध्ये सदाबहार मराठी चित्रपटगीते, लोकगीते व सुगम संगीताचे मिश्रण आहे.
कारवाँ मिनी मराठी ब्ल्यूटूथ स्पीकर म्हणून देखील कार्य करते. तसेच ते एफएम/एएम रेडिओप्रमाणे कार्य करत आवडीच्या स्टेशनवरील गाणी ऐकण्याचा आनंद देते. याव्यतिरिक्त श्रोते त्यांचे यूएसबी प्लग इन करत त्यांच्या वैयक्तिक म्युझिक कलेक्शनचा देखील आनंद घेऊ शकतात. यामध्ये एयूएक्स इन / एयूएक्स आऊट वैशिष्ट्य देखील आहे. प्री–लोडेड गाण्यांसाठी इंटरनेटची गरज नाही आणि विनाजाहिरात गाणी ऐकण्याचा आनंद घेता येतो. कारवाँ मिनी मराठीला दीर्घकाळापर्यंत टिकणारी बॅटरीचे साह्य आहे, ज्यामुळे ४ ते ५ तासांपर्यंत विनाव्यत्यय संगीत ऐकण्याचा आनंद घेता येतो. कारवाँ मिनी मराठी भारतभरात ६ महिन्यांच्या वॉरंटीसह येते.
या उत्पादनाबाबत बोलताना सारेगम इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक विक्रम मेहरा म्हणाले, ”आम्ही आतापर्यंत कारवाँ मिनीचे विविध प्रादेशिक व्हर्जन्स सादर केले आहेत आणि हे सादरीकरण दीर्घकाळापासून प्रतिक्षेत होते तसेच याची प्रचंड मागणी केली जात होती. हे नवीन व्हर्जन सदाबहार मराठी चित्रपटामधील गाणी, लोकगीते व सुगम संगीत ऐकण्याचा आनंद देते. आम्ही आशा करतो की, सर्व मराठी संगीतप्रेमी याचा आनंद घेतील.”
कारवाँ मिनी मराठीची किंमत २५९० रूपये इतकी किफायतशीर आहे. हे उत्पादन www.saregama.com, amazon.in किंवा flipkart.com वर आणि तुमच्या जवळच्या रिटेल आऊटलेट्समध्ये उपलब्ध आहे.
