fbpx
Thursday, April 25, 2024
MAHARASHTRATOP NEWS

Good news – राज्यांतर्गत रेल्वे प्रवासाला परवानगी; उद्यापासून होणार बुकिंग सुरु

मुंबई, दि. १ – राज्य सरकारने अनलॉक-४ ची नियमावली जारी केली. यामध्ये ई-पासची सक्ती रद्द करण्यात आली. यानंतर आता मध्य रेल्वेनेही राज्यांतर्गत प्रवासी वाहतूक सुरु करण्याला परवानगी दिली आहे. दरम्यान, राज्यांतर्गत रेल्वे बुकिंग उद्या २ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. यासंदर्भातील एक पत्रक मध्य रेल्वेने जारी केले आहे.

राज्य सरकारने जारी केलेल्या अनलॉक-४ च्या नियमावलीतून राज्यात आंतरजिल्हा प्रवासासाठी असलेली ई-पासची अट रद्द केली. सरकारने एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करण्यास मुभा दिली असल्याने रेल्वेद्वारे आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक आम्ही सुरू करत आहोत, अशी माहिती रेल्वेने आज एका पत्राद्वारे राज्य सरकारला दिली आहे. रेल्वेने आरक्षण पद्धतीने २ सप्टेंबरपासून राज्यांतर्गत प्रवासासाठी तिकीट बुकींग करता येईल, असे या पत्रकामध्ये स्पष्ट केले आहे.

मध्य रेल्वेचे मुख्य प्रवासी वाहतूक व्यवस्थापक डी. वाय. नाईक यांनी याबाबतचे पत्र राज्याचे मदत व पुनर्वसन सचिव किशोर राजे निंबाळकर आणि परिवहन सचिव अशोक कुमार सिंग यांना पाठवले आहे. या निर्णयाने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रवासी वाहतुकीचे नियम काय असतील, हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाहीत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading