‘कुणबी नोंदी आढळल्या म्हणून तुम्ही मागास ठरत नाहीच’
मराठ्यांना वितरीत करण्यात आलेली प्रमाणपत्र बोगस असल्याचा प्रा. हाके यांचा दावा
बीड: प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील प्रवर्गाचे नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी आंदोलकांच्या मागण्यांवरच आक्षेप घेतला आहे.
ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष यात्रा राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. त्याच्या नियोजनासाठी आज बैठक आयोजित करण्यात आल्याचे प्रा. हाके यांनी सांगितले.
आरक्षण कोणाला मिळते, कोणाकडून मिळते, याची जाणीव जरांगे पाटील आणि त्यांच्या कार्यकर्यांना आहे का? आता ज्यांना आरक्षण मिळते त्या सर्व इतर मागास प्रवर्गातील उपजाती आहेत. मराठा ही उपजात आहे का, असे सवाल प्रा. हाके यांनी केले.
मागासलेल्या जातींना पुढे आणून समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण दिले जाते. केवळ तुमच्यापैकी काहींची कुणबी नोंद सापडली म्हणून तुम्ही मागास ठरू शकत नाही, असे प्रा. हाके म्हणाले.
मुंबईत दंगली घडवायला चालले आहात का?
मुंबईत एवढ्या मोठ्या मोर्चाने जाऊन कायदा सुव्यवस्था स्थिती धोक्यात आणण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? दंगली घडवायला मुंबईला जाता का? त्यापेक्षा मंत्र्यांनाच अंतरावलीत. बोलावून घ्या, असा उपरोधिक टोला प्रा. हाके यांनी लगावले.
