… तर स्वबळावर निवडणूक लढवा; रामदास आठवले यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
सोलापूर: आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या जागावाटपात महायुतीकडून समाधानकारक जागा मिळाल्या नाहीत तर या निवडणुका स्वबळावर लढवा, अशा सूचना केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे प्रमुख रामदास आठवले यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या वतीने माढा येथे कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी आठवले बोलत होते.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही रिपब्लिकन पक्षाच्या पदरात महायुतीकडून काहीच पडलेले नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत, विशेषतः पुणे, मुंबई या महापालिका निवडणुकीत १२ ते १५ जागा आणि उपमहापौरपद मिळावे, अशी पक्षाची मागणी आहे.
या निवडणुकीत महायुतीकडून सन्मानजनक जागा मिळाल्या नाहीत तर स्वबळावर लढा. मात्र, कोणत्याही परिस्थितीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्याशी युती करू नका, असे आठवले यांनी या मेळाव्यात ki कार्यकर्त्यांना सांगितले आहे.
