Monday, May 25, 2026
Latest NewsPUNE

विष्णु-शंख वादन करुन नरेंद्र धायगुडे यांचा जागतिक विक्रम‘वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया’ मध्ये झाली नोंद

पुणे : नरेंद्र धायगुडे यांनी विष्णु-शंखावर विविध चाली आणि गाणी सादर करून एक अनोखा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. ‘वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया’ या संस्थेने या आगळ्यावेगळ्या प्रयोगाची नोंद घेत त्यांच्या नावावर अधिकृत विक्रम नोंदवला आहे.

धायगुडे यांनी पवित्र शंखातून सातही स्वरांची सप्तकावली (सा-रे-गा-मा-प-धा-नी-सा), भारतीय राष्ट्रीय गीत, सारे जहाँ से अच्छा, धार्मिक मंत्र, आरत्या, वाढदिवस गीत, पक्ष्यांचे आवाज, तसेच मॉर्स कोडचे टिक-टॅक ध्वनी असे विविध प्रयोग सादर केले. या विलक्षण कलाकृतीची दखल घेऊन ‘वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया’ ने त्यांना २६ जुलै २०२५ रोजी प्रमाणपत्र प्रदान केले.

यानंतरचा पुरस्कार सोहळा श्रीक्षेत्र देहू येथे झाला. या वेळी ‘वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया’ चे सी.ई.ओ. पवन सोळंकी यांच्या उपस्थितीत, श्री संत तुकाराम महाराजांचे वंशज ह.भ.प. माणिक महाराज मोरे यांच्या हस्ते धायगुडे यांना गौरविण्यात आले. धार्मिक कार्यांपुरते मर्यादित न ठेवता शंखाला स्वतंत्र वाद्य म्हणून मान्यता मिळावी, यासाठी ते वैज्ञानिक संशोधन करत आहेत. तसेच, हे तंत्र शिकू इच्छिणाऱ्यांना मार्गदर्शन करण्याचा त्यांचा मानस आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading