Thursday, June 4, 2026
Latest NewsPUNE

शिवसृष्टीमध्ये आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

पुणे  : महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथे साकारत असलेल्या शिवसृष्टीमध्ये आज आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गेले काही दिवस शिवसृष्टीला शिवप्रेमी नागरिकांचा मिळत असलेला उदंड प्रतिसाद पाहता शिवसृष्टीमध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचारी वर्ग यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने प्रतिष्ठानच्या वतीने सदर आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवसृष्टीचे प्रशासकीय अधिकारी अनिल पवार यांनी कळविली आहे.

पुणे महानगरपालिकेच्या वतीने डॉ. स्वाती बढीये यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या टीममध्ये डॉ. मीना भांगरे, सिस्टर वंदना लोखंडे, विठ्ठल खटावकर व सनी तावरे यांचा सहभाग होता.

यावेळी शिवसृष्टीमधील तब्बल ६० हून अधिक अधिकारी व कर्मचारी यांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने रक्तदाब, रक्तातील साखर, हिमोग्लोबिन व प्राथमिक आरोग्य तपासण्या  करण्यात आल्या.  असेही पवार यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading