Sunday, June 14, 2026
Latest NewsPUNE

गिरीश बापट यांच्या जयंती निमित्त आयुष्यमान भारत शिबीर

पुणे  : स्व.खासदार गिरीश बापट यांच्या जयंती निमित्त तसेच पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत नागरिकांसाठी औंध, बोपोडी येथील नागरिकांसाठी आयुष्यमान भारत, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना तसेच आयुष्यमान भारत हेल्थ कार्डचे (आ.भा कार्ड ) शिबीर आयोजित करण्यात आले आहे. भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांच्यामार्फत या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

याबाबत माहिती देताना सुनील माने म्हणाले, नेत्यांचा वाढदिवस सेवाभावी उपक्रम राबवून साजरा करायचा अशी भारतीय जनता पार्टीची पद्धत आहे. म्हणूनच स्व.खासदार गिरीश बापट यांची जयंती तसेच मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून आम्ही सेवा सप्ताह साजरा करत आहोत. या सेवा सप्ताहा अंतर्गत ३ सप्टेंबर पासून १७ सप्टेंबर पर्यंत आयुष्यमान भारत योजना तथा महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना तसेच आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड (आभा कार्ड ) शिबीर आयोजित केले आहे.

राज्य सरकारने नुकतेच आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजने अंतर्गत प्रत्येकाला ५ लाखांचा आरोग्यविमा मोफत देण्यात आला आहे. यामध्ये रुग्णांना महात्मा ज्योतीराव फुले योजने अंतर्गत सुद्धा रुग्णांना लाभ मिळणार आहे. त्याच प्रमाणे केंद्र सरकारने रुग्णाच्या आरोग्याशी संबंधित संपूर्ण नोंदी ठेवण्याकरीता आभा कार्ड आणले आहे. या कार्डमुळे कोणत्याही रुग्णाचा वैद्यकीय इतिहास अगदी सहज शोधता येते परिणामी त्याच्यावर उपचार करणे सोयीस्कर होते. शासकीय सुविधा मिळण्यासाठी सुद्धा या कार्डाचा उपयोग होतो. त्यामुळे औंध, औंध रोड, चिखलवाडी, बोपोडी येथील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन माने यांनी केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading