Sunday, June 14, 2026
Latest NewsPUNE

ख्रिस्ती समाज लवकरच राजकीय भूमिका घेणार – प्रशांत केदारी

पुणे : ख्रिस्ती समाज सर्व जातीधर्माच्या बांधवाना बरोबर घेऊन येणाऱ्या निवडणुकामध्ये राजकीय भूमिका घेणार असून सामाजिक राजकीय नेतृत्व संदर्भात येणाऱ्या आगामी राजकीय निवडणुकीच्या काळात ख्रिस्ती समाज एकत्र येऊन आपली ताकत दाखवणार आहे . पहिल्यांदाच पुण्यात सर्व राजकीय पक्षाकडे ख्रिस्ती समाजाला प्रतिनिधित्त्व मागणार आहे तसेच या समाजाला न्याय व हक्क मिळण्यासाठी आता राजकीय स्तरावरही हा समाज उतरणार असल्याचे रिजनल ख्रीस्चन सोआयटीचे प्रमुख प्रशांत केदारी यांनी आज जाहीर केले .

रिजनल सोसायटी ने ख्रीश्चन समाजाच्या विविध प्रश्न तसेच सामाजिक राजकीय विषयाबाबत चर्चासत्र आयोजित केले होते त्यावेळी केदारी बोलत होते .
पुढे ते म्हणाले की राजकीय चळवळ उभारत असताना समविचारी सर्व बांधवाना, अल्पसंख्याक, दलित, आदिवासी समूहाला एकत्रित करून वाटचाल करण्यात येईल असे सांगितले.या चर्चा सत्रामध्ये अनेक मान्यवर सहभागी झाले होते,
रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल डांबाळे यांनी त्यांच्या भाषणात अल्पसंख्यांक परिषदेविषयी विस्तृत माहिती दिली राज्य आणी राष्ट्रीय स्तरावर ख्रिस्ती समाजाच्या प्रश्नासाठी प्रशांत केदारी हे अत्यंत कष्ट करीत आहेत असे त्यांनी सांगितले,संविधानात दिल्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला धार्मिक, सांस्कृतिक स्वातंत्र्य आहे असे ते म्हणाले,
युवक क्रांती दलाचे उपाध्यक्ष संदीप बर्वे यांनी गांधीजी चे विचार कधीही मरनार नाही, व दैनंदिन व्यवहारात आपण केवळ भारतीय आहोत आणी आपला सामाजिक ग्रंथ संविधान आहे असे म्हटले,
उद्योजक नितीन काळे यांनी अँग्लो इंडियन कोटा ख्रिश्चन बांधवाना प्रतिनिधित्वासाठी मिळावा व ख्रिस्ती लोकांवर विनाकारण होणाऱ्या हल्या संदर्भात कमिटी स्थापन करावी असे म्हटले, सामाजिक चळवळीत धर्मगुरुणी सहकार्य करावे असे संजय गायकवाड यांनी आवाहन केले,उद्योजक शिरीष हिवाळे यांनी रिजनल ख्रिश्चन सोसायटी च्या उपक्रमाणा पाठिंबा दिला,सुनील उबल यांनी समाजाच्या कामासाठी आम्ही तत्पर आहोत असे सांगितले, बिशप प्रदीप चांदेकर यांनी प्रशांत केदारी यांच्या नेतृत्वाखाली समाज प्रगती करेल असे म्हटले, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष बिशप अशोक निकाळजे यांनी शुभेच्छा व पाठिंबा जाहीर केला, यात सुरेख सूत्र संचालन जॉन मनतोडे यांनी केले, प्रस्तवाना अँटन कदम यांनी केली, आभार निशिकांत चांदेकर यांनी मानले, यावेळी जॉन फर्नांडिस, प्रमोद पारधे,प्रतिमा  केदारी,अलीस लोबो, रेफेन्स अल्फानसो, सलूमी तोरणे,फेबियाणं सॅमसन,रतन ब्राम्हणे, विल्सन भोसले, येरवडा पास्टर फेलोशिप, शामूईल मिसाळ, मधुकर वाघमारे यासह पुणे शहरातील विविध चर्च चे व ख्रिस्ती समाजाचे नागरिक व धर्मगुरु मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading