दुबईत अडकलेल्या पुण्यातील महिलेची सुखरूप सुटका; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांचे प्रवीण ओसवाल यांच्याकडून कौतुक
पुणे : दुबईत फसवणूक झाल्याने अडचणीत सापडलेल्या पुण्यातील महिलेची सुखरूप भारतात वापसी घडवून आणण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी केलेल्या प्रयत्नांचे उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते प्रवीण ऊर्फ पोपट ओसवाल यांनी कौतुक केले आहे.
या प्रकरणात महिलेचा पासपोर्ट जप्त करून तिला कथितरीत्या तिच्या इच्छेविरुद्ध डांबून ठेवण्यात आले होते. तसेच तिच्या सुटकेसाठी पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे.
मोहोळ यांनी परराष्ट्र मंत्रालय, दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावास आणि आयपीएफ महाहेल्पलाइन यांच्या समन्वयातून महिलेच्या भारतातील सुरक्षित परतीसाठी प्रयत्न केले. तसेच या प्रकरणातील कथित आरोपींवर कारवाई करण्याची मागणी करणारे पत्र त्यांनी पुणे पोलीस आयुक्तांना दिले.
महिलेला सुरक्षितपणे मायदेशी आणून मोहोळ यांनी तिच्या संपूर्ण कुटुंबाला मोठा दिलासा दिला आहे. पुणेकरांना त्यांच्या कामाचा अभिमान असल्याची भावना प्रवीण ओसवाल यांनी व्यक्त केली.
