Wednesday, June 10, 2026
Latest NewsLIFESTYLE

एझे परफ्युम्सने स्लोचीताच्या साथीने पुण्यात साजरा केला सुगंध व ध्वनीचा एक आगळावेगळा सोहळा 

 

ब्रॅण्डच्या पहिल्यावहिल्या ऑफलाइन पदार्पणासाठी आयोजित कार्यक्रम १९ ऑगस्ट रोजी पुण्यातील सेंट्रो मॉल येथे संपन्न ~

पुणे – सवाई फ्रॅग्रन्स या सुगंधी घटकांची आघाडीची उत्पादक कंपनी सवाई फ्रेग्रन्सचा पहिलावहिला D2C परफ्युम असलेल्या एझे परफ्युम्सने लोकप्रिय रॅपर स्लोचीताच्या साथीने आपला पहिला ऑफलाइन लाँच सोहळा साजरा केला. एका परफ्युम ब्रॅण्डसाठी आयोजित करण्यात आलेला हा अभूतपूर्व सोहळा १९ ऑगस्ट रोजी पुणे येथे पार पडला. या सोहळ्यामध्ये या ब्रॅण्डच्या आजवरच्या वाटचालीमधील एक उत्‍साहपूर्ण प्रकरण लिहिले गेलेजिथे एका अनोख्याओतप्रोत भारावून टाकणाऱ्या अनुभवामध्ये सुगंधाचे साम्राज्य आवाजाच्या दुनियेत मिसळून गेले.  

या कार्यक्रमामध्ये स्लोचीताने सादर केलेल्या संगीताने व स्टेजवरच्या त्याच्या स्तिमित करणाऱ्या वावराने श्रोत्यांना भुरळ घातलीच पण त्याचबरोबर यावेळी त्याने एझे अँथम गाणेही सादर केले. कलाभावपूर्णता आणि सर्जनशीलतेचा संगम असणारे हे अँथम ब्रॅण्डचे मूळ तत्व आणि त्याच्या गाभ्याशी जपलेली मूल्ये यांचा सोहळा साजरा करणारे होते – नव्या पिढीला साचेबद्धता सहन होत नाहीकोणत्याही सीमाकोणतीही बंधने नसलेल्या जगण्याचा मुक्तपणे शोध घेण्यास ही पिढी प्राधान्य देते. आपले हे अनोखेपण लोकांसमोर मांडण्याचा नव्या पिढीचा हुरुप या गाण्यामध्ये प्रतिबिंबित झाली होती.  

लोकप्रिय रॅपरच्या घुमणाऱ्या आवाजामध्ये म्हटले गेलेले वेअर युअर एझे हे गाण्याचे बोल चलना है आगे बस बढना है‘ या ब्रॅण्डच्या नव्या पिढीशी जोडलेल्या उर्मीचे मूर्त रूप बनले. ठेका धरायला लावणारा ताल आणि सलाम या नमस्तेक्या फरक है मेरे दोस्त? ये डिव्हिजन मे है ओपरेशनबट टूगेदर वी आर ए फोर्स,’ यांसारखे ठाम मत व्यक्त करणारे शब्द यांचा मिलाफ झाला आणि त्यातून संवेदनांना आव्हान देणारी अशी एक कलाकृती निर्माण झाली. उल्हसित करणारे गंध व मधूर संगीताचे जग या कलाकृतीमध्ये एकरूप झाले. 

पुण्यातील शाखेच्या उद्घाटनाविषयी बोलताना इन्क्रेडिबल इंद्रिया (सवाई फ्रेग्रन्सेसचा B2C विभाग)च्या डिरेक्टर श्रीमती कनिष्का जैन म्हणाल्या, “या वर्षाच्या सुरुवातीला आम्ही सुरू केलेल्या प्रारंभिक डिजिटल मोहिमेपासूनच स्लोचीता सोबत आम्ही साधलेला सहयोग सर्वच बाबतीत योग्य सिद्ध होत आहे. अर्थातपुण्यातील लाइव्ह कार्यक्रमामध्ये आत्माविष्काराच्या सीमारेषा आणखी रुंदावणाऱ्या सादरीकरणामध्ये सुगंध आणि संगीताची दुनिया समरसपणे एकमेकांत मिसळली गेली तिथे हा कार्यक्रम आमच्या सर्व अपेक्षांच्या जाऊन पोहोचला. ही भागीदारी म्हणजे प्रत्येक व्यक्तीची स्वतंत्र ओळख साजरी करण्याप्रती व कलेच्या अमर्याद शक्यतांना सामावून घेण्याप्रती असलेल्या आमच्या दृढ बांधिलकीचा पुरावा आहे.”

स्लोचीता पुढे म्हणाला, “एझे अँथम सादरीकरणाला श्रोत्यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे मी भारावून गेलो आहे. खरेतर आपल्या खऱ्याखुऱ्या व्यक्तिमत्वाचा स्वीकार करण्याच्या भावनेचा उत्सव साजरा करणाऱ्या या गाण्यामध्ये भर टाकण्याची संधी मिळाल्याबद्दल मी मनापासून कृतज्ञ आहेया गाण्याला श्रोत्यांनी अगदी मनापासून दिलेला प्रतिसाद अनुभवणे हे खूप प्रेरणादायी होते. हा सहयोग लक्षणीय ठरला आहे आणि अखेर श्रोत्यांना हे गाणे प्रत्यक्षात अनुभवायला मिळत आहेयाबद्दल मी खूपच आनंदी आहे.” 

 

एझे  परप्युम आणि नव्या युगाचा रॅपर स्लोचीता यांनी कंपनीच्या डिजिटल मोहिमेसाठी सुरुवातीला साधलेल्या सहयोगामुळे प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या तुलनेत या ब्रॅण्डची वेगळी ओळख निर्माण झाली व फ्रेग्रन्स उद्योगामध्ये आघाडीचे स्थान मिळविण्याची क्षमता असलेली कंपनी म्हणून तिचे नाव भक्कमपणे प्रस्थापित झाले. 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading