fbpx

पौष्टिक जेवणामुळे पोलिसांचा उत्साह, ऊर्जा वाढेल – राजेंद्र डहाळे

पुणे : गणेश विसर्जनावेळी सलग २५-३० तास अहोरात्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात पोलीस कर्मचाऱ्यांना सकस आहार उपलब्ध करण्याचा लायन्स क्लबचा उपक्रम स्तुत्य

Read more

आजच्या झगमगत्या दुनियेत कलाकारीपेक्षा कारागिरीला जास्त महत्त्व : डॉ. प्रभा अत्रे

पुणे : आई–वडिल, गुरूंचे आशिर्वाद, रसिकांचे प्रेम साथ लाभल्यानंतर एका कलाकाराला या पेक्षा काय आवश्यक आहे? माझ्या पुढील वाटचालीसाठी ही शिदोरी खूप आहे; मी भाग्यवान आहे, अशा भावना किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांनी व्यक्त केल्या. माझ्या शिष्यांनी संगीताचा वारसा समर्थपणे पुढे न्यावा, ही एकच इच्छा आहे. आजच्या झगमगत्या दुनियेत कलाकारीपेक्षा कारागिरीला जास्त महत्त्व आले आहे. कलाकाराने या दीपवून टाकणाऱ्या वाटेकडे न जाता त्यांनी साधनेची वाट धरावी आणि स्वत:बरोबरच श्रोत्यांनाही दिव्य आनंदाची अनुभूती द्यावी, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांना मिळालेला पद्मविभूषण पुरस्कार आणि त्यांच्या 90व्या वाढदिवसानिमित्त आज स्वरावर्तन फाउंडेशनच्या संचालिका, डॉ. अत्रे यांच्या ज्येष्ठ शिष्या प्रसिद्ध गायिका आरती ठाकूर–कुंडलकर आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टस्‌‍ यांच्यातर्फे विशेष सांगीतिक सत्कार सोहळ्याचे आयोजन म. ए. सो. ऑडिटोरिअम, मयूर कॉलनी येथे करण्यात आले होते. सत्कार सोहळ्यानंतर मनोगत व्यक्त करताना त्या बोलत होत्या. पद्मविभूषण पुरस्कार मिळाल्यानंतर डॉ. अत्रे यांचा पुण्यात झालेला हा पहिलाच सांगीतिक सत्कार सोहळा होता. डॉ. प्रभा अत्रे यांचा सत्कार विख्यात बासरीवादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरासिया यांच्या हस्ते करण्यात आला. पद्मश्री पंडित व्यंकटेशकुमार, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्त्रबुद्धे, डॉ. अत्रे यांच्या ज्येष्ठ शिष्या आरती ठाकूर–कुंडलकर, प्रसिद्ध हार्मोनियम वादक सुयोग कुंडलकर मंचावर होते. सुरुवातीस आरती ठाकूर–कुंडलकर यांच्यासह पाच सुवासिनींनी डॉ. अत्रे यांचे औक्षण केले. डॉ. अत्रे पुढे म्हणाल्या, कलेने माणसातील माणूसपण जपले आहे हे आपण नेहमी लक्षात ठेवायला हवे. संगीताने माझ्या आयुष्याचे सोने केले आहे. संगीत प्रेमींच्या शुभेच्छा आणि प्रेमाने माझे मन तुडुंब भरले आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात मला पद्मविभूषण सन्मान मिळाला याचा आनंद आहे. ‘या मार्गावर खुणावतो आहे एकच सूर दूरच्या क्षितीजावरचा, साऱ्या साऱ्या नादविश्वाला सामावून घेणारा आणि भावबंधाने दरवळणारा, तिथवरची वाट अडचणीची एकाकी, वाटेवरचे दिवे फसवे–मायावी वाट रोखणारे, पुढच्या मार्गाचा विसर पाडणारे मात्र या झगमगाटात पाऊल उचलणारा स्वत:चा होता एक सूर दूरच्या क्षितीजावरचा हे‘ स्वरचित काव्य सादर करून डॉ. अत्रे यांनी मनोगताचा समारोप केला. पंडित हरिप्रसाद चौरासिया म्हणाले, मी प्रभाजींच्या गायनाचा खूप जुना प्रेमी आहे. त्यांच्याप्रती माझ्या मनात खूप श्रद्धा आहे. संगीत क्षेत्रातील त्यांची मेहनत, तपस्या मी खूप जवळून पाहिली आहे. भारतीय संगीत देश–विदेशात पोहोचविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. रसिकांचे प्रेम त्यांना कायम मिळत राहो. त्यांचा गौरव करण्याची जर मला संधी मिळाली तर मी त्यांना ‘भारत नवरत्न‘ असा पुरस्कार देईन, अशा सदिच्छाही त्यांनी व्यक्त केल्या. पंडित व्यंकटेशकुमार म्हणाले, डॉ. प्रभा अत्रे, पंडित हरिप्रसाद चौरासिया यांच्यासारखे उत्तुंग व्यक्तिमत्त्व असलेले कलाकार बघायला मिळणे माझे सौभाग्य आहे, त्यांच्या दर्शनाने माझ्या जन्माचे सार्थक झाले आहे. संगीत क्षेत्रातील गुरू–शिष्य परंपरा अखंडितपणे सुरू राहावी, पुढील पिढीला शास्त्रीय संगीत अनुभवायला मिळावे, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) म्हणाले, आजचा  दिवस ऐतिहासिक आहे. ‘तारे जमीन पर‘ असा योग जुळून आला आहे. डॉ. अत्रे यांच्या सत्कार सोहळ्याच्या आयोजनाचा मान संस्थेला मिळाला हा संस्थेच्या दृष्टीने भाग्ययोग आहे. सुरुवातीस आरती ठाकूर कुंडलकर यांनी गुरुंविषयी आदरभाव व्यक्त करीत कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. मान्यवरांचा सत्कार सुयोग कुंडलकर, आरती ठाकूर–कुंडलकर, एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), राजीव सहस्त्रबुद्धे यांनी केला. डॉ. प्रभा अत्रे यांच्या कार्याचा आढावा घेणारी चित्रफित दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद देशमुख यांनी केले. म. ए. सो.चे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे, प्रदीप नाईक, म. ए. सो.च्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्षा आनंदी पाटील, बाबासाहेब शिंदे, नियामक मंडळाचे सदस्य डॉ. संतोष देशपांडे, म. ए. सो.चे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव इंजिनिअर सुधीर गाडे, महाविद्यालयाचे महामात्र डॉ. गोविंद कुलकणी आदी उपस्थित होते. सत्कार सोहळ्यानंतर किराणा घरण्याचे ज्येष्ठ गायक पद्मश्री पंडित व्यंकटेशकुमार यांच्या शास्त्रीय गायनाची मैफल रंगली. प्रसिद्ध तबलावादक भरत कामत आणि सुप्रसिद्ध संवादिनीवादक सुयोग कुंडलकर समर्पक साथसंगत केली.

Read more

‘के आसिफ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात’, ‘बनी’ सर्वोत्कृष्ट  तर ‘मोऱ्या’ कथा, अभिनय दिग्दर्शनासह अव्वल !

उत्तर प्रदेशमधील सहाव्या ‘के आसिफ – चंबळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ २०२२ मध्ये निर्माते शंकर धुरी यांच्या ‘आकृती क्रिएशन्स’ निर्मित आणि निलेश उपाध्ये

Read more

ज्या प्रकारे नवनीत राणा यांनी गणपतीचे विसर्जन केले त्या कडेलोटाने मी दुखावले-डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : गणेश विसर्जनाच्या वेळी बाप्पाला निरोप देताना राणा दाम्पत्याने आपली गणेश मूर्ती पाण्यात उंचावरून फेकून दिली असल्याचे त्यांच्या व्हायरल

Read more

आजच्या पावसामुळे पुणेकरांच्या झालेल्या त्रासास भाजप च जबाबदार -प्रदीप देशमुख

पुणे : पुण्यात ढगफुटीसदृश पाऊस; अग्निशामक दलाकडे आठ ठिकाणी पाणी साठल्याच्या तर पाच ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्याची नोंद झाली आहे

Read more

ऋषिकेश येथे महाराष्ट्रातील यात्रेकरूंच्या वाहनाला अपघात; चौघांचा मृत्यू अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले मुख्यमंत्री 

मुंबई  : उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे तीर्थयात्रेसाठी गेलेल्या महाराष्ट्रातील चौघा यात्रेकरुंचा भीषण अपघातात मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ

Read more

महाराष्ट्रात ‘ड्रोन शेती’च्या प्रसारासाठी राज्य शासन प्रयत्न करणार – कृषीमंत्री अब्दुल सत्तार

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कृषी मंत्र्यांची ग्वाही नागपूर :  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ड्रोन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतीमध्ये तुषार

Read more

राहाता मधील ‘बीएलओ’च्या नाविन्यपूर्ण संकल्पना राज्यासाठी मार्गदर्शक – मुख्य निवडणूक अधिकारी

शिर्डी : राहाता तालुक्यातील मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी (बीएलओ) ‘कुटुंब रजिस्ट्रर’सारख्या राबविलेल्या नावीन्यपूर्ण संकल्पना राज्यातील बीएलओंसाठी मार्गदर्शक आहेत. असे गौरवोद्गार राज्याचे

Read more

पुण्यात पावसाचा कहर नागरिकांच्या घरात पाणी शिरले

पुणे: जवळ दोन तासांपासून पुण्यात मुसळधार पाऊस पडत आहे.जोरदार सुरू असून अचानक सुरू झालेल्या पावसामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

Read more

शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद यांचे निधन

नरसिंहपूर – शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद यांचे निधन झाले. ते 99 वर्षांचे होते. मध्य प्रदेशमधील नरसिंहपूर जिल्ह्यात गोटेगाव जवळील झोटेश्वर धाम येथे

Read more

शिवसेना भवन जवळ शिंदे गटाचे मध्यवर्ती कार्यालय झाले तरीतरी काही फरक पडणार नाही – डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : शिवसेनेचे मुख्यालय असलेल्या शिवसेना भवन जवळच शिंदे गटाचे मध्यवर्ती कार्यालय उभारण्यात येणार आहे. या सर्व घडामोडीत मुंबईतील मध्यवर्ती

Read more

शिरुर मतदार संघात २०२४ मध्ये भाजपाचा विजय निश्चित – माधुरी मिसाळ यांचा विश्वास

पिंपरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात विकासाची वाटचाल सुरू असून, २०२४ मध्ये शिरुर लोकसभा मतदार संघात निश्चितपणे भाजपाचा

Read more

नवनीत राणा यांनी पोलिस स्टेशनमध्ये केलेलं वर्तन योग्य नाही – डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे:  पोलिसांवर तुमचा राग असेल. तर पोलिसांकडून सुरक्षा का घेता. केंद्रात, राज्‍यात तुमचे सरकार आहे.पोलिसांची सुरक्षा काढून का टाकत नाही,

Read more

व्यापक देश हितासाठी एकजुटीने ‘भारत जोडो’त सहभागी होणे आवश्यक – काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी

पुणे : देशाच्या सार्वभौम व व्यापक हितासाठी, सामाजिक सलोखा व सदभावनेच्या वाढीसाठी, लोकशाहीच्या बळकटी साठी “देशातील समस्त काँग्रेस जनांनी अर्थातच्

Read more

जश्न–ए–इश्कः सेलिब्रटिंग लव्ह

शबाना आझमी सादर करतील सौरेंद्रो – सौम्योजित यांच्या संगीत आणि कवितांनी भरलेली एक संध्या प्रेम ह्या भावनेव्यतिरिक्त कदाचितच अन्य कुठली

Read more

मराठवाड्यातील कुणबी असल्याचे पुरावे मराठा क्रांती मोर्चा आयोगाला सोमवारी पुण्यात देणार

१ मे १९६० पासून आजपर्यंतच्या शैक्षणिक, नोकऱ्यातील अनुशेष भरावा पुणे  : मराठवाड्यातील मराठा समाजाचा इतर मागासवर्गात समावेश करणे व १

Read more

एब्सोल्यूट बारबेक्यू ने बाणेर येथे उघडले आपले रेस्टॉरंट 

पुणे : प्रमुख बार्बेक्यू रेस्टॉरंट चेन एब्सोल्यूट बारबेक्यू (AB’s) ने आज आपले ५८ वे रेस्टॉरंट उघडले असुन हे  पुण्यातील  त्यांचे

Read more

‘विभागीय मुख्यमंत्री सचिवालया’चे कामकाज अधिक गतिमान करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाला निर्देश

मुंबई  : ग्रामीण भागीतील जनतेला त्यांच्या कामांसाठी मंत्रालयात येण्याची आवश्यकता भासू नये. स्थानिक पातळीवरच त्यांचा प्रश्न निकाली निघावा. सामान्यांना लोकाभिमुख, पारदर्शक

Read more

प्रभादेवीतल्या राड्यानंतर पुण्यात शिंदे गट शिवसेना आमने सामने व्हिडिओ आला समोर

पुणे : मुंबईतील प्रभादेवी इथं गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान शिवसेना विरुद्ध शिंदे गट आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं होतं. विशेष म्हणजे आता

Read more
%d bloggers like this: