fbpx
Friday, April 26, 2024
BusinessLatest News

एब्सोल्यूट बारबेक्यू ने बाणेर येथे उघडले आपले रेस्टॉरंट 

पुणे : प्रमुख बार्बेक्यू रेस्टॉरंट चेन एब्सोल्यूट बारबेक्यू (AB’s) ने आज आपले ५८ वे रेस्टॉरंट उघडले असुन हे  पुण्यातील  त्यांचे ५ वे रेस्टॉरंट आहे. बाणेरमधील या एब्सोल्यूट बार्बेक्यूजमध्ये १२० आसन क्षमता आहे जेणेकरूण कोणत्याही प्रसंगासाठी आणि उत्सवासाठी  येथे बुकींग केली जाऊ शकते. येथे  वाढदिवास आणि अॅनव्हर्सरीज वेगळ्याच उत्साहात साजरे केले  जातात .
२०१३ मध्ये सुरू झालेला एब्सोल्यूट बारबेक्यू हा बार्बेक्यु स्पेसमधील एक सुप्रसिद्ध ब्रँड आहे ज्याने भारतातील २३ शहरांमध्ये आपला ठसा  उमटवला आहेत. कंपनीचे दुबईमध्ये दोन आणि कतारमध्ये एक रेस्टॉरंट आहे.आकाश पाल  टेरिटरी मॅनेजर (वेस्ट) ऑपरेशन्स म्हणाले, आम्ही  नेहमीच आमच्या ग्राहकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करतो. बाणेर बऱ्याच काळापासून आमच्या नजरेत होते. कारण येथुन आमच्याकडे नेहमीच व्यवसायासाठी चौकशी  केली जात होती.  अखेरीस ऍस्पिरेशन बिल्डिंग, फॅब इंडियाच्या समोर, बाणेर येथे आम्ही एब्सोल्यूट बारबेक्यू सूरू केले, ज्याचा आम्हाला आनंद होत आहे. मला विश्वास आहे की अनखो  खाद्यपदार्थ आणि सेवांमुळे आम्ही लवकरच शहरातील सर्वाधिक मागणी असलेले बारबेक्यू रेस्टॉरंट बनू,

यावेळी बोलताना,फाउंडर आणि सीईओ –  प्रोसेनजीत रॉय चौधरी म्हणाले, आमचे सध्या ५८ आउटलेट आहेत आणि विमाननगर येथे आणखी आउटलेट उघडण्याची योजना आहे आणि इतर ५ आऊटलेट्सचे देखील बांधकाम सूरू आहे.  प्रत्येक आउटलेटसाठी अंदाजे ३.५  करोड गुंतवणूकीची आवश्यकता आहे.  आणि पुढील २ वर्षांत सुमारे १०० आउटलेटपर्यंत पोहोचण्याची आमची योजना आहे. सध्या आमच्या ग्रुपची उलाढाल अंदाजे  रु. ४३० कोटी आहे. आमच्या सर्व रेस्टॉरंटमधील सर्व  कर्मचार्यांचे पूर्णपणे लसीकरण झालेले आहे आणि  ग्राहकांना भेटताना ते   सर्व सुरक्षा उपायांचे पालन करतात, एबीच्या सर्व रेस्टॉरंटमध्ये सर्व प्रकारच्या आरोग्य, स्वच्छता आणि सरकारी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जाते.

आम्ही एब्सोल्युट बारबेक्यूमध्ये  ग्राहकांच्या जबाबदारी सोबतच आमच्या   सामाजिक जबाबदारीचेही भान ठेवतो आणि समाजाचे देणे परत करण्याचा प्रयत्न करतो. आमच्या ५८ व्या आउटलेटच्या लाँचसाठी ब्रँडने “उत्कर्ष, तळेगाव” या  मानवतावादी दृष्टीकोणातुन कार्यरत एनजीओशी हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला आहे,  ज्याचां दृष्टीकोण आणि ध्येय  निराशाजनक जीवनात आशा निर्माण करणे हे आहे. ते गरीब, गरजू ,उपेक्षित, वंचित आणि सोडून दिलेल्या  अश्या लोकांसाठी कार्य करतात. एबीने आपल्या उद्धाटनासाठी उत्कर्ष एनजीओ मधील सुमारे ४३ मुलांना लॉन्चच्या वेळी आमंत्रित केले आहे. यावेळी एबीची  संपूर्ण  टीम आणि वरिष्ठ व्यवस्थापन या  मुलांसोबत दर्जेदार वेळ घालवतील आणि त्यांना सन्मानित करतील.

हा एनजीओ रस्त्यावरील/झोपडपट्टीतील मुलांपर्यंत पोहोचणे, अनाथ आणि निष्पाप मुलांना आश्रय देणे, विधवांची काळजी घेणे, एचआयव्ही पॉझिटिव्ह उद्ध्वस्त कुटुंबे आणि  मुले यांच्यापर्यंत पोहोचण्याचे कार्य करतो.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading