fbpx
Sunday, May 19, 2024
Latest NewsMAHARASHTRA

बॅरिस्टर अंतुले यांना हिरवा साप बोलणारे गीते आज त्यांचाच फोटो लावत आहेत; सुनील तटकरेंचा हल्लाबोल

रायगड : बॅरिस्टर अंतुले यांना हिरवा साप बोलणारे अनंत गीते आज बॅरिस्टर अंतुले यांचा फोटो लावत आहेत. अनंत गीते यांनी जातीय तेढ वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या विरोधात अल्पसंख्याक समाजाला चुकीचे सांगितले तरी हा अल्पसंख्याक समाज माझ्या पाठीशी ठाम उभा राहिल. असं म्हणत रायगड लोकसभेचे उमेदवार सुनील तटकरे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गिते यांच्यावर जोरदार टिका केली. महायुतीची गोरेगाव येथील जिजाऊ मैदानावर जाहीर सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी तटकरेंनी शेकापचे जयंत पाटील यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला.

जयंत पाटील यांनी राष्ट्रीय नेतृत्वाला आणून कोपर्‍यात सभा घेतली. परंतु या विराट सभेने त्यांना प्रत्युत्तर मिळाले. या रायगडात सामाजिक सलोखा आम्ही जपला आहे. परंतु या पवित्र भूमीत सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम केले जात आहे. जयंत पाटील तुम्ही शिवसेनेच्या पाया पडलात. म्हणून तुम्हाला आमदार केले गेले. लोकसभेतून पक्षाला हद्दपार केले ही जयंत पाटील यांची अलौकिक कामगिरी असेल. महायुतीने मुंबई महानगरपालिका ताब्यात घेतली तर मासा पाण्याबाहेर पडल्यावर तडफडतो तशी अवस्था उध्दव ठाकरे यांची होणार आहे तशीच अवस्था तर रायगडमधून शेकापलाही हद्दपार केल्यावर होणार आहे. अशा इशाराही तटकरेंनी जयंत पाटलांना दिला.

पुढे बोलतांना सुनील तटकरे म्हणाले की, नरेंद्र मोदी देशाची प्रगती करत आहेत. त्यांच्या विकासाच्या वाटेवर आम्ही एनडीएमध्ये सत्तेत सहभागी झालो आहोत. त्याचबरोबर समान नागरी कायदा आणि कलम ३७० बद्दल होणारे गैरसमज याबाबत देखील यावेळी तटकरेंनी भाष्य केले. भरतशेठ आणि मी, आम्ही दोघेही कामाची माणसे आहोत. आपली माणसे आहोत. भरतशेठ तुम्ही राज्य सरकारची कामे करा, मी केंद्र सरकारची कामे आणेन, असा शब्द देतानाच तटकरेंनी गोरेगाव रेल्वे स्टेशनचा प्लॅटफॉर्म उंच करण्याचे काम आणि लांब पल्ल्याच्या गाड्या थांबण्यासाठी प्रयत्न करेन, अशी ग्वाही देखील त्यांनी मतदारांना दिली.

दरम्यान, आपल्याला सोबत काम करायचे आहे. या ऐतिहासिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर बटन दाबून मला विजयी करा. माझा मुस्लिम समाज धर्मनिरपेक्ष विचाराची कास धरेल आणि आपल्या पाठीशी उभा राहिल, असे आवाहन करत तटकरेंनी विश्वास व्यक्त केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading