Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

आजच्या झगमगत्या दुनियेत कलाकारीपेक्षा कारागिरीला जास्त महत्त्व : डॉ. प्रभा अत्रे

पुणे : आईवडिलगुरूंचे आशिर्वादरसिकांचे प्रेम साथ लाभल्यानंतर एका कलाकाराला या पेक्षा काय आवश्यक आहेमाझ्या पुढील वाटचालीसाठी ही शिदोरी खूप आहेमी भाग्यवान आहेअशा भावना किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉप्रभा अत्रे यांनी व्यक्त केल्यामाझ्या शिष्यांनी संगीताचा वारसा समर्थपणे पुढे न्यावाही एकच इच्छा आहेआजच्या झगमगत्या दुनियेत कलाकारीपेक्षा कारागिरीला जास्त महत्त्व आले आहेकलाकाराने या दीपवून टाकणाऱ्या वाटेकडे  जाता त्यांनी साधनेची वाट धरावी आणि स्वत:बरोबरच श्रोत्यांनाही दिव्य आनंदाची अनुभूती द्यावीअशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.

किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉप्रभा अत्रे यांना मिळालेला पद्मविभूषण पुरस्कार आणि त्यांच्या 90व्या वाढदिवसानिमित्त आज स्वरावर्तन फाउंडेशनच्या संचालिकाडॉअत्रे यांच्या ज्येष्ठ शिष्या प्रसिद्ध गायिका आरती ठाकूरकुंडलकर आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टस्‌‍ यांच्यातर्फे विशेष सांगीतिक सत्कार सोहळ्याचे आयोजन सोऑडिटोरिअममयूर कॉलनी येथे करण्यात आले होतेसत्कार सोहळ्यानंतर मनोगत व्यक्त करताना त्या बोलत होत्यापद्मविभूषण पुरस्कार मिळाल्यानंतर डॉअत्रे यांचा पुण्यात झालेला हा पहिलाच सांगीतिक सत्कार सोहळा होताडॉप्रभा अत्रे यांचा सत्कार विख्यात बासरीवादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरासिया यांच्या हस्ते करण्यात आलापद्मश्री पंडित व्यंकटेशकुमारमहाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्त्रबुद्धेडॉअत्रे यांच्या ज्येष्ठ शिष्या आरती ठाकूरकुंडलकरप्रसिद्ध हार्मोनियम वादक सुयोग कुंडलकर मंचावर होतेसुरुवातीस आरती ठाकूरकुंडलकर यांच्यासह पाच सुवासिनींनी डॉअत्रे यांचे औक्षण केले.

डॉअत्रे पुढे म्हणाल्याकलेने माणसातील माणूसपण जपले आहे हे आपण नेहमी लक्षात ठेवायला हवेसंगीताने माझ्या आयुष्याचे सोने केले आहेसंगीत प्रेमींच्या शुभेच्छा आणि प्रेमाने माझे मन तुडुंब भरले आहेभारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात मला पद्मविभूषण सन्मान मिळाला याचा आनंद आहे.

या मार्गावर खुणावतो आहे एकच सूर दूरच्या क्षितीजावरचासाऱ्या साऱ्या नादविश्वाला सामावून घेणारा आणि भावबंधाने दरवळणारातिथवरची वाट अडचणीची एकाकीवाटेवरचे दिवे फसवेमायावी वाट रोखणारेपुढच्या मार्गाचा विसर पाडणारे मात्र या झगमगाटात पाऊल उचलणारा स्वत:चा होता एक सूर दूरच्या क्षितीजावरचा हे‘ स्वरचित काव्य सादर करून डॉअत्रे यांनी मनोगताचा समारोप केला.

पंडित हरिप्रसाद चौरासिया म्हणालेमी प्रभाजींच्या गायनाचा खूप जुना प्रेमी आहेत्यांच्याप्रती माझ्या मनात खूप श्रद्धा आहेसंगीत क्षेत्रातील त्यांची मेहनततपस्या मी खूप जवळून पाहिली आहेभारतीय संगीत देशविदेशात पोहोचविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहेरसिकांचे प्रेम त्यांना कायम मिळत राहोत्यांचा गौरव करण्याची जर मला संधी मिळाली तर मी त्यांना ‘भारत नवरत्न‘ असा पुरस्कार देईनअशा सदिच्छाही त्यांनी व्यक्त केल्या.

पंडित व्यंकटेशकुमार म्हणालेडॉप्रभा अत्रेपंडित हरिप्रसाद चौरासिया यांच्यासारखे उत्तुंग व्यक्तिमत्त्व असलेले कलाकार बघायला मिळणे माझे सौभाग्य आहेत्यांच्या दर्शनाने माझ्या जन्माचे सार्थक झाले आहेसंगीत क्षेत्रातील गुरूशिष्य परंपरा अखंडितपणे सुरू राहावीपुढील पिढीला शास्त्रीय संगीत अनुभवायला मिळावेअशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.

एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्तम्हणालेआजचा  दिवस ऐतिहासिक आहे. ‘तारे जमीन पर‘ असा योग जुळून आला आहेडॉअत्रे यांच्या सत्कार सोहळ्याच्या आयोजनाचा मान संस्थेला मिळाला हा संस्थेच्या दृष्टीने भाग्ययोग आहे.

सुरुवातीस आरती ठाकूर कुंडलकर यांनी गुरुंविषयी आदरभाव व्यक्त करीत कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विषद केलीमान्यवरांचा सत्कार सुयोग कुंडलकरआरती ठाकूरकुंडलकरएअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), राजीव सहस्त्रबुद्धे यांनी केलाडॉप्रभा अत्रे यांच्या कार्याचा आढावा घेणारी चित्रफित दाखविण्यात आलीकार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद देशमुख यांनी केले.

सो.चे उपाध्यक्ष डॉयशवंत वाघमारेप्रदीप नाईकसो.च्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्षा आनंदी पाटीलबाबासाहेब शिंदेनियामक मंडळाचे सदस्य डॉसंतोष देशपांडेसो.चे सचिव डॉभरत व्हनकटेसहाय्यक सचिव इंजिनिअर सुधीर गाडेमहाविद्यालयाचे महामात्र डॉगोविंद कुलकणी आदी उपस्थित होते.

सत्कार सोहळ्यानंतर किराणा घरण्याचे ज्येष्ठ गायक पद्मश्री पंडित व्यंकटेशकुमार यांच्या शास्त्रीय गायनाची मैफल रंगलीप्रसिद्ध तबलावादक भरत कामत आणि सुप्रसिद्ध संवादिनीवादक सुयोग कुंडलकर समर्पक साथसंगत केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading