fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNETOP NEWS

प्रभादेवीतल्या राड्यानंतर पुण्यात शिंदे गट शिवसेना आमने सामने व्हिडिओ आला समोर

पुणे : मुंबईतील प्रभादेवी इथं गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान शिवसेना विरुद्ध शिंदे गट आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं होतं. विशेष म्हणजे आता नवनवे व्हिडीओ समोर येत आहेत. या व्हिडीओमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकांमध्ये शिंदे गट समर्थक आणि शिवसैनिक यांच्यातील अटीतटीची स्पर्धा सुरु असल्याचं पाहायला मिळालंय. गणपती विसर्जन मिरवणुकीत पुण्यातही शिंदे गट समर्थक आणि शिवसैनिक आमनेसामने आले होते. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये दोन्ही गटाकडून एकमेकांना चिथवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप केला जातोय. हे व्हिडीओ आता सोशल मीडियातही व्हायरल होऊ लागले आहेत.
पुण्यातील कासेवाडी भागातील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दोन मंडळं एकमेकांसमोर आली होती. गणपतीच्या मिरवणुकीत एकनाथ शिंदे यांचं नाव घेतलं गेल्याचं या व्हिडीओत ऐकू येतंय. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा फोटो एक कार्यकर्ता हाता घेऊन नाचताना दिसलाय. या मिरवणुकीदरम्यान दोन्ही मंडळांकडून एकमेकांना चिथवण्याचा प्रकार घडला. गणेश मिरवणुकीदरम्यान घडलेला हा प्रकार आता चर्चेचा विषय ठरतोय.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading