आजच्या पावसामुळे पुणेकरांच्या झालेल्या त्रासास भाजप च जबाबदार -प्रदीप देशमुख
पुणे : पुण्यात ढगफुटीसदृश पाऊस; अग्निशामक दलाकडे आठ ठिकाणी पाणी साठल्याच्या तर पाच ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्याची नोंद झाली आहे पुणे शहरात आज दुपारपासून मुसळधार पाऊस सुरू असून या पावसाने रस्त्यांना अक्षरशः नदी नाल्यांचा स्वरूप प्राप्त झाला आहे. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भारतीय जनता पक्षावर तोंडसुख घेतलं आहे. राष्ट्रवादीचे पुणे शहर प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी भारतीय जनता पक्षाचे लक्ष केवळ टेंडरवर असून च्या पंचवार्षिक मध्ये 99 नगरसेवक भाजपाला देऊन आता पुण्यातील पुणेकर डोक्यावर हात मारून घेत आहे . आजच्या पावसामुळे पुणेकरांच्या झालेल्या त्रासास भाजप च जबाबदार अशी घनाघाती टीका प्रदीप देशमुख यांनी भाजपवर केली.
देशमुख म्हणाले संपूर्ण पावसाळ्यात रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून आज या सगळ्याची परिसीमा पाहायला मिळाली आजची पुणेकरांची संध्याकाळ कशी गेली असेल हे कधीही विसरता येणार नाही. असे प्रदीप देशमुख म्हणाले.
गेल्या दोन-तीन महिन्यापासून पुण्याला पालकमंत्री नाही. आम्ही पुण्याला पालकमंत्री द्या अशी सतत मागणी करत आहोत. पालकमंत्री नसल्यामुळे प्रशासन मनमानी कारभार करत आहे. कोणाचा कोणावर ही कंट्रोल राहिला नाही. अशी टीका प्रदीप देशमुख यांनी शिंदे व फडणविस सरकारवर केली.
