Saturday, September 12, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करण्यास मान्यता

पुणे महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन

पुणे : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त पुणे महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांना व्यापक आणि प्रभावी स्वरूप देण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींची समिती स्थापन करण्यास पुणे महानगरपालिकेने मान्यता दिली आहे. यासंदर्भातील ठराव उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी दिला होता.

या समितीसाठी सामाजिक, शैक्षणिक व समतावादी विचारांच्या व्यापक प्रसाराला तसेच महात्मा फुले यांच्या कार्याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने तज्ज्ञ व्यक्तींची निवड करण्यात येणार आहे. या माध्यमातून द्विशताब्दी वर्षभर विविध कार्यक्रमांचे नियोजन केले जाणार आहे. असे उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी सांगितले.

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि समतावादी विचारांचा व्यापक प्रसार व्हावा, तसेच त्यांच्या कार्याची माहिती विविध माध्यमांतून नव्या पिढीपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त पुणे महानगरपालिकेच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे प्रस्तावित आहे.

यापूर्वी पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभेने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी वर्ष तसेच महात्मा फुले यांच्या २००व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार तज्ज्ञ समितीचे कामकाज लवकरच सुरू करण्यात येणार असून, समितीच्या माध्यमातून द्विशताब्दी वर्षासाठी विविध कार्यक्रम, उपक्रम आणि आयोजनांची सविस्तर रूपरेषा निश्चित केली जाणार असल्याचेही उपमहापौर वाडेकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading