fbpx
Friday, April 26, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

ज्या प्रकारे नवनीत राणा यांनी गणपतीचे विसर्जन केले त्या कडेलोटाने मी दुखावले-डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : गणेश विसर्जनाच्या वेळी बाप्पाला निरोप देताना राणा दाम्पत्याने आपली गणेश मूर्ती पाण्यात उंचावरून फेकून दिली असल्याचे त्यांच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत दिसले आहे. ज्या पाण्यात मूर्ती फेकली ते पाणीदेखील गढूळ असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. त्यावर गणपतीचे विसर्जन ज्या प्रकारे राणा यांनी केले त्या कडेलोटाने मी दुखावले. असे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.  नीलम गोऱ्हे म्हणाल्या

एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प २, औरंगाबाद या लेटरहेडवर दिनांक ८ सप्टेंबर २०२२ तारीख असलेले एक पत्र व्हायरल झाले आहे. त्यामध्ये ‘मुख्यमंत्री, महाराष्ट्र यांची सोमवार दिनांक १२/०२/२०२२ रोजी पैठण मतदारसंघात सभा आयोजित केली असून आपल्या प्रकल्पातील सर्व पर्यवेक्षिका तसेच ४२ गावातील अंगणवाड्या सेविका, मदतनीस सर्व यांना कार्यक्रमास उपस्थित राहण्याबाबत गटविकास अधिकारी यांच्या सूचना आहेत. तरी सदर कार्यक्रमास कावसानकर स्टेडियम, पैठण येथे ठीक सकाळी १०.०० वाजता उपस्थित राहावे,’ असा मजकूर या व्हायरल पत्रात आहे. त्यावर नीलम गोऱ्हे म्हणाल्या,नुकतचं एक पत्रक आलंय. मुख्यमंत्र्यांच्या सभेला उपस्थिती लावण्याबाबत. खोटं परिपत्रक कसं निघालं?ज्यांच्या सहीने हे पत्र व्हायरल होतंय ते अधिकारी शांत का? असा सवाल नीलम गोऱ्हे यांनी गटविकास अधिकारी यांना केला.
शिक्षक गावातील मुख्यालयात राहत नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. तर शिक्षक मुख्यालयात न राहता निवासासाठी देण्यात येणारा भत्ता उचलतात” असा आरोप आमदार प्रशांत बंब यांनी विधीमंडलाच्या अधिवेशनात केला होता. त्यामुळे आज पुण्यात सेंटर बिल्डिंग येथे शिक्षकांचे आंदोलन सुरू आहे. त्यावर नीलम
गोऱ्हे म्हणाल्या,बंब यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शिक्षक नाराज आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading