Saturday, June 6, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना ‘या’ मतदारसंघात मिळाली उमेदवारी

मुंबई : उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या वतीने मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

वास्तविक मुंबईतील दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून वर्षा गायकवाड या इच्छुक होत्या. त्यामुळे जागा वाटपात ही जागा काँग्रेस पक्षाला सुटावी यासाठी देखील त्यांनी प्रयत्न केले होते.

मात्र, महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा उद्धव ठाकरे गटाला सोडण्यात आली होती. त्यामुळे वर्षा गायकवाड या नाराज असल्याची देखील चर्चा होती. मात्र, आपली नाराजी दूर करत वर्षा गायकवाड या महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचाराला देखील लागल्या होत्या.

मात्र, आता वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading