fbpx
Sunday, May 26, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNE

‘कट-कारस्थानांचा डीएनए’ हा भाजप’चा.. काँग्रेसचा नव्हे ..!‘वारसा हक्क संपत्तीकर लावण्याचे मनसुबे २०१९साली भाजपचेच..!!राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी


पुणे : इंडीयन ओव्हरसीजचे (विदेशी) काँग्रेसचे अघ्यक्ष सॅम पित्रोदा यांनी शिकागो येथील एका कार्यक्रमात, अमेरीकेतील वारसाहक्क संपत्ती बाबत काय कायदा आहे (?)याची माहीती दिली. ते अमेरीकेचे नागरीक असून त्याचा अर्थोअर्थी भारताशी काहीही संबंध नाही.
अमेरीकेत एखादी श्रीमंत व्यक्ती मृत पावल्यास त्याची सु ५५ % संपत्ती ‘वारसा कराच्या’ रुपाने सरकार जमा होते व ती सरकारच्या कोषागारातुन समाज कल्याणाकरीता खर्च होते, एवढेच सॅम पित्रोडा म्हणाले होते. यावर काँग्रेस नेते श्री जयराम रमेश यांनी सॅम पित्रोडा यांचे वक्तव्याशी काँग्रेसचा कोणताही संबंध नसल्याचे देखील सांगितले आहे..!
तरी देखील ‘भाजपचे नेते ते प्रवक्ते’ नेतृत्वाकडून आलेला खोटारडेपणाचा प्रपोगंडा करण्याचा वारसाहक्क निभावत, अमेरीकन वास्तव्य असलेल्या पित्रोदांच्या विघानाचा कपोलकल्पित आघार घेत व अकलेचे तारे तोडत
“काँग्रेस भारतात वारसा हक्क संपत्ती कर लाऊन देशातील नागरीकांची संपत्ती लुटण्याचे कट कारस्थान रचत असल्याचा”(?) बालीश व हास्यास्पद आरोप करत असल्याचे प्रतिपादन काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले.
ते पुढे म्हणाले की,
मुळात भाजप नेते व प्रवक्त्यांनी किमान हे लक्षांत ठेवावयास हवे होते की, मुळात “काँग्रेसचा न्याय पत्र जाहीरनामा” हा सत्ताधारी पक्षाच्याही अगोदर जाहीर झाला आहे..! त्यामध्ये “वारसाहक्क संपत्ती कराचा” कुठेही ऊल्लेख नाही..किमान आरोप करण्यापुर्वी हे तरी तपासले पाहीजे होते..!
तसेच जर ‘वारसा हक्क संपत्तीकराच्या’ रुपाने देशातील नागरीकांची संपत्ती लुटण्याचे कट – कारस्थान” जर कोणी केले असेल, तर दस्तूरखुद्द मोदी – शहांच्या विकसीत भाजपने २०१९ मध्ये तत्कालीन अर्थमंत्री जयवंत सिन्हा यांनी वारसाहक्क संपत्तीकर भारतात लागु करण्याचे विधान केले होते.. किमान हे तरी भाजपच्या भाषणजीवी नेतृत्वाने लक्षात घ्यायला हवे होते..! त्यामुळेच ‘कट कारस्था करण्याचा डीएनए हा भाजपचाच’ असल्याचे ध्यानात येईल अशी पुस्ती ही काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी जोडली..!

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading