शिवसेना भवन जवळ शिंदे गटाचे मध्यवर्ती कार्यालय झाले तरीतरी काही फरक पडणार नाही – डॉ. नीलम गोऱ्हे
पुणे : शिवसेनेचे मुख्यालय असलेल्या शिवसेना भवन जवळच शिंदे गटाचे मध्यवर्ती कार्यालय उभारण्यात येणार आहे. या सर्व घडामोडीत मुंबईतील मध्यवर्ती ठिकाण ‘दादर हे हिंदुत्ववादी संघटनांचे नवे सत्ताकेंद्र बनत असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. त्यावर विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.जर तर लाअर्थ नाही.झालं शिवसेना भवन जवळ शिंदे गटाचे मध्यवर्ती कार्यालय झाले तरीतरी काही फरक पडणार नाही . असा टोला शिवसेनेच्या नेत्या व विधानसभेचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शिंदे गटाला लगावला आहे.
मुंबईतील प्रभादेवीत शिवसेना आणि शिंदे गटात झालेल्या राडा प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
शिंदे गटाच्या तक्रारीनंतर दादर पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. त्यानंतर आता पोलिसांनी आता शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांनी केलेल्या गोळीबाराच्या आरोपांची चौकशी सुरू केली आहे. सदा सरवणकर यांनी दोन वेळेस गोळीबार केला असल्याचा आरोप होत आहे. शिवसेनेने केलेल्या दाव्यानुसार सरवणकर यांच्या गोळीबारात शिवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत आणि एक पोलीस अधिकारी बचावला. तर, सरवणकर यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. त्यावर नीलम गोऱ्हे म्हणाल्या,पोलिस बंदोबस्त जेव्हा असतो तेव्हा सिसिटीव्ही असतात. सत्य काय ते समोर येईल. जर का पोलिस तपासात गोळीबार केल्याचं उघड झालं असेल. आणि त्यांचे प्रवक्ते जे बोलत होते यावर कारवाई होवू शकते.पोलिसांवर दबाव आणून काम केलं जातंय.असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
लव जिवाद प्रकरणी, हिंदु तरुणींना फसवणे आणि त्यांचे धर्मांतर करणे हे मोठे षड्यंत्र आहे. त्याला हिंदु तरुणी बळी पडत आहेत. हिंदु तरुण दीपक बर्डे याचे अपहरण केल्याच्या प्रकरणात ५-६ आरोपींना अटक केली आहे; परंतु पोलिसांना त्यांच्याकडून दीपक बर्डे याचा काहीच सुगावा लागत नाही. यावर विश्वास बसत नाही. आरोपींचे पोलिसांशी लागेबंधे आहेत. आमच्याकडे असलेली नावे आम्ही संबंधितांना देणार आहोत. आरोपींशी आर्थिक संबंध ठेवणारे पोलीस आरोपींवर कसे कारवाई करतील ?, असा घणाघात भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पोलिसांवर केला. त्यावर
नीलम गोऱ्हे म्हणाल्या,त्यांच्या हातात मच्छर मारायची बॅट आहे. त्याने फरक पडत नाही. असा टोला नितेश राणे यांना नीलम गोऱ्हे यांनी लगावला.
