Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

पुण्यात पावसाचा कहर नागरिकांच्या घरात पाणी शिरले

पुणे: जवळ दोन तासांपासून पुण्यात मुसळधार पाऊस पडत आहे.जोरदार सुरू असून अचानक सुरू झालेल्या पावसामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. तसेच पुण्यातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून त्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.
दोन तासात कोसळणारया मुसळधार पाऊसामुळे अग्निशमन दलाकडे 8 ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना तर 5 ठिकाणी झाडपडल्याच्या नोंदी असून अग्निशमन अधिकारी व जवान प्रत्यक्ष घटनास्थळी काम करीत आहेत.
दरम्यान हवामान विभागाने ३ ते ४ दिवस मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती दिली आहे. त्यानुसार आता मागील २-३ तासांपासून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. या पाऊसा मुळे पुण्यातले रस्ते जलमय झाले आहेत तर काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. तसेच रस्ते जलमय झाले असून रस्त्यावर नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
घोरपडी गावातील बी टी कवडे रस्ता परिसरातील तारा दत्त कॉलनीमध्ये सर्व घरात शिरले असून गल्लीतील रस्त्यावर कमरे इतके पाणी साचले आहे. नागरिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले असून घरातील फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक वस्तु मध्ये पाणी घुसले आहे.
पाणी साचलेले भाग

1) चंदननगर पोलिस स्टेशन
2) वेदभवन, कोथरुड
3) वनाज जवळ कचरा डेपो, कोथरुड
4) लमाण तांडा, पाषाण
5) सोमेश्वर वाडी, पाषाण
6) वानवडी, शितल पेट्रोल पंप
7) बी टी ईवडे रोड
8) काञज उद्यान

झाडपडी

1) एनसीएल जवळ पाषाण
2) साळुंखे विहार, कोंढवा
3) ज्योती हॉटेल जवळ कोंढवा
4) चव्हाणनगर
5) रुबी हॉल जवळ, पुणे स्टेशन

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading