पुणे विभाग- 2 लाख 90 हजार 59 कोरोना बाधित रुग्ण बरे, विभागात कोरोना बाधित 3 लाख 79 हजार 673 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव


पुणे,दि.21 :- पुणे विभागातील 2 लाख 90 हजार 59 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3 लाख 79 हजार 673 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 79 हजार 773 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 9 हजार 841 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.59 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 76.40 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 52 हजार 168 रुग्णांपैकी 2 लाख 3 हजार 507 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 43 हजार 74 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 587 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.22 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 80.70 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 30 हजार 92 रुग्णांपैकी 20 हजार 250 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 976 आहे. कोरोनाबाधित एकूण 866 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 28 हजार 786 रुग्णांपैकी 19 हजार 898 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 859 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 29 हजार 332 रुग्णांपैकी 18 हजार 590 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 640 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 102 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 39 हजार 295 रुग्णांपैकी 27 हजार 814 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 10 हजार 224 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 257 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 6 हजार 689 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 3 हजार 667, सातारा जिल्ह्यात 977 , सोलापूर जिल्ह्यात 584, सांगली जिल्ह्यात 811 तर कोल्हापूर जिल्ह्यात 650 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 16 लाख 50 हजार 318 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 3 लाख 79 हजार 673 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 20 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

Leave a Reply

%d bloggers like this: