Wednesday, September 2, 2026
MAHARASHTRATOP NEWS

आमंत्रण आले तरी जाणार नाही प्रकाश आंबेडकर यांची स्पष्ट भूमिका

पुणे,दि. १८ – दादर इंदू मिल या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार असून त्याची पायाभरणी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार होती. मात्र या कार्यक्रमाला बाबासाहेबांचे नातू व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर तसेच इतर नेत्यांना बोलवण्यात आले नसल्याने हा कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आला. याबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. मात्र आपल्याला आता आमंत्रण आले तरी या पायाभरणी कार्यक्रमाला आपण जाणार नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. देशाला पुतळ्याची गरज नसून रुग्णालयाची गरज आहे. त्यामुळे राज्यात या पैशाचा उपयोग कोरोना सेंटर उभारण्यात करावा, असे स्पष्ट मत ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी मांडले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading