Tuesday, September 1, 2026
MAHARASHTRA

सारथीसह मराठा समाजाशी संबंधित योजनांचे कारभारी आता अजित पवार

मुंबई –  राज्य सरकारने आज जीआर जारी करत सारथी संस्थेसह मराठा समाजाच्या योजना राबवण्याची जबाबदारी अजित पवार यांच्याकडील नियोजन विभागाकडे वर्ग केली आहे. सारथी संस्था आणि मराठा समाजाशी संबंधित योजनांची जबाबदारी काँग्रेसचे मंत्री विजय वड्डेटीवार यांच्या बहुजन कल्याण विभागाकडे होती. मात्र ओबीसी समाजाचे असलेले विजय वड्डेटीवार मराठा समाजाला न्याय देत नसल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपासून होत होता. या आरोपांनी व्यथित झालेल्या वड्डेटीवार यांनी सारथीची जबाबदारी अजित पवारांनी स्वीकारावी अशी त्यांना विनंती केली होती.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही सारथी संस्थेची जबाबदारी त्यांच्या अखत्यारितील नियोजन विभागाकडे घेण्याचे जाहीर केले होते. मात्र काँग्रेसचा सुरुवातीला याला विरोध होता. अखेर आज यासंदर्भात जीआर जारी करून सारथी संस्थेसह मराठा समाजाच्या इतर योजनांची जबाबदारीही अजित पवार यांच्याकडील नियोजन विभागाकडे वर्ग करण्यात आली आहे.

मराठा संघटनांच्या आक्रमक पवित्र्यामुळं गेल्या काही दिवसांपासून ‘सारथी’ संस्थेचा मुद्दा चर्चेत होता. मात्र आता सारथीची सूत्रे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच हातात घेतली आहेत.

मराठा समाजातील तरुणांच्या प्रशिक्षणासाठी व कौशल्य विकासासाठी स्थापण करण्यात आलेली ‘सारथी’ ही संस्था बंद पाडण्याचा घाट महाविकासआघाडी सरकारनं घातला आहे, असा आरोप गेल्या काही दिवसांपूर्वी होत होता. मराठा संघटना आणि खासदार संभाजीराजे भोसले यांनी देखील यावर आक्रमक भूमिका घेतली होती.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading