Thursday, September 3, 2026
ENTERTAINMENTNATIONAL

NSD च्या अध्यक्षपदी अभिनेता परेश रावल

नवी दिल्ली – नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या (एनएसडी) अध्यक्षपदी माजी खासदार आणि अभिनेते परेश रावल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे काम आव्हानात्मक पण मजेशीर असेल, असं मत त्यांनी प्रतिक्रिया देताना व्यक्त केलं. त्यांची ही नियुक्ती पुढील चार वर्षांसाठी असणार आहे.

एनएसडीने ट्वीट करत माहिती दिली की, “आम्हाला सांगताना आनंद होत आहे की, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रख्यात अभिनेते आणि पद्मश्री परेश रावल यांची एनएसडीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. एनएसडी कुटुंब त्यांचे स्वागत करत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एनएसडी नवीन उंची गाठेल.”

संस्कृती मंत्रालयाने ट्वीट करत म्हटलं की,, “प्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेते आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते परेश रावल यांची एनएसडीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केल्याबद्दल मनापासून अभिनंदन. त्यांच्या सक्षम नेतृत्वात एनएसडी नक्कीच नवीन उंचावर जाईल.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading